संरक्षण मंत्रालय
युद्धनौका उत्पादन अधीक्षक परिषद
Posted On:
15 NOV 2022 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
कोलकाता येथील युद्धनौका पर्यवेक्षण चमूने युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक व्हाइस ऍडमिरल किरण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 15 नोव्हेंबर 22 रोजी युद्धनौका उत्पादन अधीक्षक परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण सहाय्यक नियंत्रक रिअर ऍडमिरल संदीप एस संधू, संरक्षण मंत्रालयाच्या एकात्मिक मुख्यालयाच्या (नौदल ) युद्धनौका डिझाईन विभागाचे आणि जहाज उत्पादन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व 7 युद्धनौका/पाणबुडी उत्पादन अधीक्षक आणि युद्धनौका पर्यवेक्षण चमू आणि पाणबुडी देखरेख टीमचे अधिकारी उपस्थित होते.
H3GW.JPG)
युद्धनौका उत्पादन अधीक्षक परिषदेने भारतातील संरक्षण जहाजबांधणी प्रक्रिया सुधारण्यासाठी डीपीएसयू आणि जहाज दुरुस्ती करणाऱ्या खाजगी कारखान्यांद्वारे अवलंबण्यात येणाऱ्या कल्पना आणि अत्याधुनिक उत्पादन आणि प्रकल्प व्यवस्थापन तंत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी एक समान मंच प्रदान केला.
F9AT.JPG)
विविध आव्हाने, शिकलेले धडे आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वापरल्या जाणार्या नाविन्यपूर्ण पद्धतींवरही या परिषदेत विचार विनिमय झाला.
पंतप्रधानांच्या “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेच्या धर्तीवर संरक्षण संबंधी जहाजबांधणी क्षेत्रात 100% स्वदेशीकरण साध्य करण्याचे मार्ग आणि साधनांवर चर्चा करण्याची संधी या परिषदेने प्रदान केली. डब्ल्युओटी (कोलकाता) च्या 60 व्या वर्धापन दिनी युद्धनौका उत्पादन अधीक्षक परिषद 2022 चा योग जुळून आला.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1876280)
Visitor Counter : 214