वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातल्या प्रसिद्ध डिझाईन संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या  दहापटीने वाढवण्याचे  पियुष गोयल यांचे आवाहन


भारताचं फॅशन तंत्रज्ञान जगाच्या विकसित बाजारपेठांमध्ये नेण्याची महत्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे: पियुष गोयल

देशाच्या दुर्गम भागात विशेषतः पूर्व आणि ईशान्य भागात मानवी संसाधनांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं मंत्र्यांचं आवाहन

शैक्षणिक संस्थांनी वसाहतवादी मानसिकतेची छाप काढून टाकण्याचं गोयल याचे  आवाहन

भारतातल्या प्रत्येक महाविद्यालयाचं आवार स्टार्टअप उद्योगांचं उगमस्थान बनलं पाहिजे : पियुष गोयल

भारतातील संकुलांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करायचं गोयल याचं आवाहन 

Posted On: 12 NOV 2022 5:34PM by PIB Mumbai

 

भारतातल्या प्रसिद्ध संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या दहापटीने वाढवावी असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय परराष्ट्र व्यापार संस्था(IIFT), भारतीय पॅकेजिंग संस्था(IIP), भारतीय डिझाईन संस्था(NID), भारतीय फॅशन तंत्रज्ञान संस्था(NIFT) आणि पादत्राणे डिझाईन आणि विकास संस्था(FDDI) च्या मुख्य आणि वरिष्ठ प्राध्यापकांशी संवाद साधताना बोलत होते

उद्योग आणि अंतर्गत व्यवहार चालना विभागाचे (DPIIT) सचिव अनुराग जैन, वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल, वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, उद्योग आणि अंतर्गत व्यवहार चालना विभागाच्या विशेष सचिव सुमिता डावरा, उद्योग आणि अंतर्गत व्यवहार चालना विभागाचे विशेष सचिव आणि आर्थिक सल्लागार शहांक प्रिया आणि इतर विविध विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या पाच प्रसिद्ध संस्थांसोबत अशा प्रकारचा हा पहिलाच संवाद असल्याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधलं. या पाचही संस्थांचा सखोल सहयोग आवश्यक असून यामुळे पाचही संस्था एकत्र काम त्यांचा परस्पर ताळमेळ विकसित होईल असं ते म्हणाले. संसाधनांचा प्रभावी वापर होण्याच्या उद्देशाने या सर्व संस्थांच्या एक सामायिक मंच तयार करून याबाबत त्यांना बळ देण्यासाठी त्यांचं एकत्रीकरण आवश्यक असल्याचं प्रतिपादन गोयल यांनी केलं आहे.

माजी विद्यार्थ्यांचा सशक्त जाळे  तयार करून या माजी विद्यार्थ्यांचा एखादा मार्गदर्शन कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे. माजी विद्यार्थ्यांच्या जाळ्यामुळे गुरुकुलांचा विकास होण्यास मदत होते असं मत त्यांनी व्यक्त केलं. कॉर्पोरेट क्षेत्राने प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांना सढळ हस्ते मदत करण्याच आवाहन त्यांनी केलंआहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केलेल्या पंचप्राणाचा संदर्भ देत गोयल यांनी  शैक्षणिक संस्थांना या पाच सूत्रांचा अंगीकार एकत्रितपणे करण्याचं आवाहन केलं आहे. शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनी मानवी संसाधनांचा वापर केवळ शहरात न करता देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत करावा अस त्यांनी सांगितलं. कोणतही मूल मागे पडता कामा नये याचा पुनरुच्चार करत शैक्षणिक संस्थांनी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवावे असं आवाहन त्यांनी केलं.

संस्थांनी शाश्वत संबंध विकसित करण्यासाठी देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेक अंगांनी विविधता आणावी अशी सूचना त्यांनी केली आहे. प्रक्रिया, सराव  आणि काम करण्याची पद्धत यातून वसाहतवादी मानसिकतेचा छाप काढून टाकण्यासाठी झगडून यात बदल करावेत असं ते म्हणाले. वसाहतवादी मानसिकतेतून वगळण्याची प्रवृत्ती वाढीस लागून ते सामान्य माणसाला मुख्य प्रवाहापासून दूर असा ठेवते असं मत त्यांनी व्यक्त केलं. गोयल यांनी आपल्या पाळमुळांपर्यंत जाण्याची आवश्यकता व्यक्त केली. आपल्या परंपरा आणि वारशापासून अनेक गोष्टी शिकून त्या जगाला देण्यास बराच वाव आहे असं प्रतिपादन गोयल यांनी केलं आहे.

जागतिक बाजारपेठेत आपापल्या संकल्पनांचे विपणन करण्यासाठी स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांची भलामण करुन आपापल्या शैक्षणिक संस्थांकरता जागतिक संधी (कॅम्पस प्लेसमेंट) पदरात पाडून घेण्याच्या प्रमाणात वाढ  करण्याचे आवाहन, पियुष गोयल यांनी  केले.  प्रत्येक संस्थेने स्टार्टअपसाठी बीजे रोवून त्यांना खतपाणी घालणारे  बनायला हवे  आणि नवकल्पना तसच उद्योजकता विकसित करुन त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पियुष गोयल यांनी व्यक्त केले.  जगाच्या भविष्यातल्या  गरजा पूर्ण करण्यासाठी आपले अभ्यासक्रम परिपूर्ण आणि सज्ज आहेत का, याचे आत्मपरीक्षण करावे असे आवाहन त्यांनी शिक्षण संस्थांना केले.  आपण भारताचे फॅशन तंत्रज्ञानव्यापक अशा समृद्ध जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे असेही ते म्हणाले. आपल्या शिक्षणसंस्थांच्या अध्यापक वर्गाची क्षमता आणि पाया  भक्कम करण्याची आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे निरीक्षणही गोयल यांनी यावेळी नोंदवले.

आपल्या शिक्षण संस्थांनी अधिकाधिक नवनवीन फॅशन रचनांच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या नमुन्यांचा अभ्यास करून त्यावर आधारित निरीक्षणांचे शोधनिबंध प्रकाशित करावेत अशी सूचनाही त्यांनी केली. त्याचबरोबर अत्याधुनिक संशोधनाचा पाया रचून, त्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन, या संशोधनाची निरीक्षणे प्रकाशित करावीत, असेही सांगितले. संस्थेचे आवार, उपकरणे, चाचणी प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करून त्यांना जागतिक दर्जाचे बनवण्याचे आवाहनही त्यांनी केले. या शैक्षणिक संस्थांनी, क्षेत्रीय ओळख ठरु शकणारी संभाव्य GI  उत्पादने शोधून त्यांचे संवर्धन करुन, ती  विकसीत करण्याची विनंतीही गोयल यांनी यावेळी केली.  2 हजारांपर्यंत GI उत्पादने विकसित असण्याची क्षमता भारतामध्ये आहे, असे त्यांनी नमूद केले.

5 संस्थांनी त्यांच्या संस्थात्मक रचना आणि कार्यप्रणालीच्या ठळक पैलूंवर, या कार्यक्रमात सादरीकरण केले, तसेच संस्थेची पुढील वाटचाल आणि विस्तारासाठी आवश्यक असलेल्या त्यांच्या सूचना आणि गरजा मांडल्या.

केंद्राच्या, एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यांचा निर्यात केंद्र म्हणून विकास, अशा उपक्रमांना चालना मिळावी या दृष्टीने या शैक्षणिक संस्थांनी जिल्हा औद्योगिक केंद्रांशी (डीआयसी) कायम  संपर्कात रहावे, अशी सूचना वाणिज्य विभागाचे सचिवसुनील बार्टवाल यांनी यावेळी केली.

विचार आणि सहकार्याची अधिक सखोल आणि शाश्वत देवाणघेवाण करण्यासाठी, संस्था प्रमुख आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गाभा समूह तयार केला जाऊ शकतो अशी सूचना, वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव  रचना शाह यांनी केली.  आपले विद्यार्थी आणि प्राध्यापकांना  आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक वाव मिळायला हवा अशी अपेक्षा आणि गरजही त्यांनी व्यक्त केली.

संस्थांमध्ये, उद्योग संबंधित संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज, डीपीआयआयटीचे सचिवअनुराग जैन यांनी व्यक्त केली, तसच  अशा प्रकारच्या संशोधनात्मक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले.

एकमेकांमध्ये समन्वय निर्माण करुन, साधनसंपत्ती आणि सर्वोत्तम अशा शैक्षणिक प्रक्रियांची, त्याबाबत आलेल्या अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी एकत्र येण्याकरता प्रोत्साहन देण्यावर, या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले. यामुळे नवनवीन संकल्पनांचा एकमेकांना उपयोग करता येईल असा विचार या बैठकीत मांडण्यात आला.  अगदी अलिकडचे नवीन तंत्रज्ञान सादर करून, तसेच उद्योग जगताच्या, संशोधनात्मक आणि विकासात्मक गरजा आणि बाजारपेठेतील विशिष्ट गरजा सादर करून, उद्योग जगत आणि शैक्षणिक संस्थांमधला सहयोग, तसच  परस्पर व्यवहार वाढवणाऱ्या सामाईक व्यासपीठांच्या पर्यायांबाबत चर्चा झाली. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून, शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतरही त्यांच्याशी सहजीवनात्मक संबंध राखण्यासाठी, त्यांनी शिक्षण घेतलेल्या संस्थांमधले  त्यांचे योगदान वाढवण्यासाठी, परस्पर संपर्काचे जागतिक व्यावसायिक जाळे तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या देवाणघेवाणी मार्फत परदेशी संस्थांशी सहयोग वाढवण्याबाबत, तसच एकमेकांच्या डिझाइन म्हणजेच फॅशनच्या रचनांच्या नमुन्यांमध्ये बदल सुचवून किंवा आदान प्रदान करून, हातमाग आणि हस्तकला समुहांच्या, समुदाय किंवा क्षेत्रीय विकासाबाबत सूचना मांडण्यात आल्या.

***

S.Kane/S.Naik/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875525) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Hindi