संरक्षण मंत्रालय
वेस्टर्न एयर कमांड कमांडर्स परिषद
Posted On:
11 NOV 2022 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2022
नवी दिल्लीत 10 आणि 11 नोव्हेंबर 2022 रोजी पश्चिम विभागाच्या वरिष्ठ हवाई अधिकाऱ्यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पश्चिम हवाई कमांडचे हवाई अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन यांनी कमांड मुख्यालयात आगमन झाल्यावर,हवाई दल प्रमुखांचे स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.
मोहिमांसाठीची सज्जता, उपकरणे आणि सामग्रीची कार्यक्षमता तसेच प्रत्यक्ष आणि माहितीविषयक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर हवाई दल प्रमुखांनी भर दिला.
दलाची संरचना , आत्मनिर्भरता आणि स्वदेशीकरणाद्वारे भारतीय हवाई दलाची कार्यान्वयन क्षमता वाढवणे ही भविष्यातील सज्जतेची गुरुकिल्ली आहे , असेही त्यांनी सांगितले. सर्व काळात सर्व प्रकारच्या मंचांची , शस्त्र प्रणाली आणि सामग्रीची परिचालनविषयक सज्जता नेहमीच सुनिश्चित करण्याचे निर्देश हवाई दल प्रमुखांनी सर्व कमांडर्सना यावेळी दिले.
या परिषदेत , चीनमध्ये 2016 पर्यंत भारताचे राजदूत असलेल्या अशोक के कांथा,यांनी सध्या सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध, चीन-रशिया संबंध आणि भारत आणि जगावर जाणारे परिणाम याबद्दल या परिषदेत त्यांचे धोरणात्मक विश्लेषण केले . यानंतर भारतीय संरक्षण मंत्र्यांचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे माजी महासंचालक आणि सचिव आणि सध्या नीती आयोगाचे सदस्य असलेल्या डॉ. विजय कुमार सारस्वत यांनी आपल्या भाषणात उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आपले विचार मांडले.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1875359)
Visitor Counter : 147