मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या विविध प्रकल्पांचा घेतला आढावा

Posted On: 07 NOV 2022 8:59PM by PIB Mumbai

पणजी, 7 नोव्हेंबर 2022

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी आज भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या मुरगाव येथील विभागीय केंद्राला भेट दिली.  यावेळी राज्यमंत्र्यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला आणि सर्वेक्षणाचे सादरीकरण आणि मासेमारीची पाहणी करण्यासाठी सागरी प्रवास केला. भारतीय मत्स्य सर्वेक्षणाचे महासंचालक डॉ. आर जयाभास्करन, भारतीय मत्स्य सर्वेक्षणाचे विभागीय संचालक  डॉ. एस रामचंद्रन आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

मुरगाव विभागीय केंद्रामधील मोटर फिशिंग व्हेसल(एमएफव्ही) सागरिका आणि एमएफव्ही येलोफिन या दोन सर्वेक्षण जहाजांची देखील डॉ. एल मुरुगन यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सर्वेक्षणाचे सादरीकरण आणि मासेमारीची पाहणी करण्यासाठी सागरी प्रवास केला.

महासंचालक डॉ. आर जयाभास्करन यांनी केंद्रीय मंत्र्यांना भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या विविध कामांची माहिती दिली. गोवा, कर्नाटक आणि लक्षद्वीप बेटांलगतच्या किनारपट्टीवर भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रामधील सागरी मत्स्यसंपदेचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन करण्याचे महत्त्वाचे काम या संघटनेकडून कशा प्रकारे हाती घेतले जाते याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील उद्योजकांना विविध प्रकारच्या मासेमारीच्या तंत्राचे प्रशिक्षण, मासेमारी क्षेत्र ओळखणे आणि मासेमारी उद्योगाला ही माहिती पुरवणे यांसारख्या यापूर्वी केलेल्या कामगिरींबद्दलही त्यांनी मंत्र्यांना माहिती दिली.

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa

 

 

 

 

 

 




(Release ID: 1874358) Visitor Counter : 132


Read this release in: English