माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ एल मुरुगन घेणार 53 व्या इफ्फीच्चा तयारीचा आढावा


केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या विविध प्रकल्पांची आढावा बैठक

प्रविष्टि तिथि: 06 NOV 2022 3:21PM by PIB Mumbai

 

 

पणजी, 6 नोव्हेंबर 2022

 

केंद्रीय माहिती व प्रसारण आणि मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय खात्याचे राज्यमंत्री डॉ एल. मुरुगन गोवा दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्री 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतील. याप्रसंगी इफ्फीच्या तयारीशी संबंधित विविध विभागाचे प्रतिनिधी सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ मुरुगन मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथील विविध प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. याप्रसंगी डॉ मुरुगन एमएफव्ही सागरीका आणि एमएफव्ही यलोफीन या सर्वेक्षणासाठीच्या जहाजांची आणि मुरगाव बंदरात मासेमारी क्षेत्राची पाहणी करणार आहेत.   

***

ST/PK

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1874104) आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी