संरक्षण मंत्रालय
फ्रान्सच्या एकोनीट युद्ध नौकेने 28 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 22 दरम्यान मुंबईला दिली भेट
Posted On:
03 NOV 2022 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2022
फ्रेंच नौदलाच्या पाच ला फेएट क्लास फ्रिगेट्सपैकी एक असलेली एकोनीट ही युद्ध नौका 28 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 22 या कालावधीत मुंबईच्या सदिच्छा भेटीवर होती. यावेळी जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांशी व्यावसायिक आणि सामाजिक संवाद साधला. या भेटीचा समारोप भारतीय नौदलाच्या पश्चिम ताफ्यामधील युद्धनौकेबरोबरच्या सागरी सरावाने संपन्न झाला. फ्रिगेटने यापूर्वी 2015 मध्ये विशाखापट्टणमला भेट दिली होती.
कमांडिंग ऑफिसर, कमोडोर (सीडीआर) गुयॉन यांनी पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ वाईस एडमिरल (व्हीएडीएम) कृष्णा स्वामीनाथन यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर संवाद साधला.
गेल्या काही दशकांमध्ये भारत आणि फ्रान्स दरम्यानचे संरक्षणाशी संबंधित विविध क्षेत्रांमधील सहकार्य वेगाने विकसित झाले आहे. एफएनएस एकोनीटची ही मुंबई भेट, दोन्ही नौदलांमधील वाढते सहकार्य आणि वृद्धिंगत झालेली आंतर-कार्यक्षमता याचे प्रतिबिंब आहे. सागरी क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य हे समान हिताचे मुद्दे असल्यामुळे, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्र काम करायला दोन्ही देशांची नौदले वचनबद्ध आहेत.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1873581)
Visitor Counter : 160