कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

निवृत्तीवेतन धारकांना डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठीच्या देशव्यापी अभियानाची केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली घोषणा

Posted On: 02 NOV 2022 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022

देशभरातील निवृत्तीवेतन धारकांना नोव्हेंबर महिन्यात डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आणि  फेस ऑथेंटिकेशन  अ‍ॅपच्या उपयोगासाठी  केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज राष्ट्रव्यापी अभियानाची घोषणा केली. ‘या अमृतकाळातडिजिटल व्यवहार करण्यास सक्षम असे निवृत्तीवेतनधारक डिजिटली सक्षम राष्ट्राची उभारणी करण्यात आपले योगदान देतील असे ते यावेळी म्हणाले. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात, सर्व निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करावा लागतो.(यात, 80 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या वृद्ध निवृत्तीवेतन धारकांना ऑक्टोबर महिन्यात सादर करण्याच्या  विशेष तरतूदीसह) हा दाखला सादर केल्यानंतर त्यांचे निवृत्तीवेतन सुरळीत चालू राहू शकते. पारंपरिकरित्या, निवृत्तीवेतन धारकांना प्रत्यक्ष रूपात, निवृत्तीवेतन वितरण अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहून हा दाखला द्यावा लागत असे. मात्र, वयोवृद्ध, आजारी आणि दुर्बळ ज्येष्ठ नागरिकांसाठी ही प्रक्रिया अतिशय कठीण असते. त्याशिवाय, पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन वितरण प्राधिकरणाच्या नोंदींमध्ये त्यांच्या जीवन प्रमाणपत्रांच्या अद्ययावतीकरणाबाबत स्थिती जाणून घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नव्हती.

या सर्व निवृत्तीवेतन धारकांचे आयुष्य  सुलभ’ करण्यासाठी केंद्र सरकार डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच डिजिटल स्वरूपातला हयातीचा दाखला देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

डॉ. जितेंद्र सिंग यांनी नोव्हेंबर 2022 या महिन्यासाठी देशव्यापी अभियानाची घोषणा केली आणि सर्व निवृत्ती वेतनधारकांना फेस ऑथेंटिकेशन  तंत्रज्ञानाच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सर्व निवृत्ती वितरण प्राधिकरणांना डीएलसी/फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या संदर्भात भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांना तसेच बँकांना,या सेवेचा लाभ  जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व सरकारी निरामयता केंद्रे/दवाखाने/रुग्णालयांना देखील याचा प्रसार करण्यासाठी आपापल्या परिसरात शिबिरे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, पेन्शनर्स असोसिएशनना देखील डीएलसी सादर करण्याबद्दल पेन्शनधारकांना मार्गदर्शन करणारी शिबिरे आयोजित करत योग्य माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1873267) Visitor Counter : 259


Read this release in: English , Urdu , Hindi