अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुऊर्जा विभागाने आयोजित केली स्वच्छता मोहीम 2.0


अनेक फायलींचा निपटारा, स्थळांची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट, तक्रारींचे निराकरण करण्यात आले

Posted On: 01 NOV 2022 8:54PM by PIB Mumbai

मुंबई, 1 नोव्हेंबर 2022

अणुऊर्जा विभागाने (डीएई) ऑक्टोबर 2022 या संपूर्ण महिन्यात स्वच्छता 2.0 या विशेष मोहिमेचा भाग म्हणून विविध उपक्रम आयोजित केले होते. ही विशेष मोहीम राबवण्यासाठी विभागाने 78 स्थळे निश्चित केली होती. या मोहिमेत एकूण 39,949 फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले, त्यापैकी 31,441 फायलींचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. 228 ई-फायली पुनरावलोकनासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. एकूण 104 दावे आणि तक्रारी निराकरण करण्यासाठी निश्चित केल्या गेल्या.  परीक्षा आणि विल्हेवाटीसाठी 11 पीएमओ संदर्भ आणि विल्हेवाटीसाठी खासदारांचे 10 संदर्भ निश्चित करण्यात आले होते.              

भंगाराची विल्हेवाट लावून जास्तीतजास्त महसूल मिळवणे आणि कार्यालयाच्या परिसरातील जागा मोकळी करणे हे अणुऊर्जा विभागाचे उद्दिष्ट आहे. तसेच, तक्रार निवारण, व्हीआयपी संवाद निपटारा, नियमांचे सुलभीकरण आदींवर विशेष भर देण्यात आला आहे.

टप्पा- I : डीएईच्या नोडल अधिकार्‍यांकडून विशेष मोहिमेचा आढावा

अणुऊर्जा विभाग (डीएई) ने आपल्या अंतर्गत असलेल्या 13 घटकांसह, ज्यात संशोधन आणि विकास (R&D), औद्योगिक आणि खनिजे, सेवा क्षेत्र, 11 अनुदानित संस्था, 5 सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना (PSUs) यांचा समावेश आहे, त्यांनी  भारतभरातील प्रलंबित बाबी 2.0 चा निपटारा करण्यासाठी 2 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विशेष मोहीम आयोजित केली होती, आणि तोच कार्यक्रम दस्त-ऐवज व्यवस्थापन, स्वच्छता (अंतर्गत आणि बाह्य), आणि कार्यालयीन भंगाराची विल्हेवाट, नियम/प्रक्रिया सुलभ करणे, जागा मोकळी करणे आदि  उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. सर्व केंद्र/पीएसयु//एआयएस प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठीच्या या विशेष मोहीम 2.0 मध्ये सहभागी झाले. नियमित देखरेखीसाठी विभागाने केंद्रे/पीएसयु/अनुदानित संस्थांबरोबर तीन आढावा बैठका घेतल्या.

विशेष मोहीम 2.0 ची उद्दिष्ट-पूर्तता   

भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाने विविध उपक्रमांद्वारे या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला. स्वच्छता पंधरवडा आणि रेकॉर्ड रूम व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून सर्व विभागांची पाहणी/भेट आयोजित करण्यात आली. कार्यालयाचा परिसर स्वच्छ करून, जागा मोकळी करून आणि स्वच्छता मोहिमा राबवून केंद्रे/पीएसयू/एआय यांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवला. प्रलंबित पीएमओ संदर्भ, संसदीय आश्वासनांचा निपटारा, तक्रार निवारण, व्हीआयपी संवादाचा निपटारा, नियमांचे सुलभीकरण इत्यादींना प्राधान्य देण्यात आले आणि उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न केले गेले.

CANTEEN CLEANING IMAGE

 

S.Patil /R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1872859) Visitor Counter : 162


Read this release in: English