नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात नागरी हवाई वाहतूक सेवा संस्थेच्या (सीएएनएसओ) आशियाई पॅसिफिक परिषदेचे आयोजन

Posted On: 01 NOV 2022 4:02PM by PIB Mumbai

पणजी, 1 नोव्हेंबर 2022

गोव्यामध्ये 1 ते 3 नोव्हेंबर 2022 या काळात नागरी हवाई वाहतूक सेवा संस्थेची (सीएएनएसओ) तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवसांमध्ये, आशिया पॅसिफिक देश आणि अन्य देशातील प्रतिनिधी आणि प्रदर्शनात सहभागी असलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा आणि सहयोग करतील. हे मुद्दे आशिया खंडातील विमान वाहतूक उद्योगाचे भविष्य घडवण्यामध्ये मदत करतील आणि 2045 मध्ये सेवा देण्यासाठी संपूर्ण हवाई वाहतूक प्रणाली (सीएटीएस) विकसित करण्याच्या जागतिक परिषदेच्या दृष्टीकोनाला मूर्त रूप देतील. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय हवाई वाहतूक तथा रस्ते आणि महामार्ग खात्याचे राज्यमंत्री जनरल (डॉ.) विजय कुमार सिंग (निवृत्त), सीएएनएसओचे महासंचालक सायमन हॉक्वार्ड, आणि नागरी विमान वाहतूक सचीव राजीव बन्सल, 2 नोव्हेंबर 2022 रोजी या परिषदेला संबोधित करतील. जागतिक विचारसरणी, प्रादेशिक सहयोग, स्थानिक पूर्तता ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे.

सीएएनएसओ चे आशिया पॅसिफिक क्षेत्राचे संचालक पोह थेन सोह यांनी सांगितले: हवाई वाहतूक क्षेत्र पूर्वपदावर येत असताना, आता कोविड-19 च्या पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. सीएटीएस चा दृष्टीकोन समोर ठेवून, आशिया पॅसिफिक क्षेत्रातील हवाई वाहतूक सेवा पुरवठादारांनी शाश्वततेसारखे महत्वाचे मुद्दे हाताळण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि वापर करून एकमेकांशी सहयोग करायला पुढे यायला हवे.

भविष्यातील हवाई वाहतूक सेवेबाबतचा सीएएनएसओचा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशनचाही या परिषदेत समावेश आहे. परिषदेत सहभागी होणार्‍या प्रतिनिधींना आशिया पॅसिफिक क्षेत्रातील हवाई वाहतूक व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळेल.

सीएएनएसओ चे महासंचालक सायमन हॉक्वार्ड म्हणाले की, कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि मिळवता येण्याजोगी, शाश्वत आणि लवचिक प्रणाली निर्माण करणे ही या उद्योगाची प्राथमिकता नव्हती. आता, हवाई वाहतूक व्यवस्थापनामध्ये मानक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सीएएनएसओ, सर्व देशांतील सहकाऱ्यांबरोबर सहयोग करायला उत्सुक आहे.     

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार म्हणाले की, भारतीय विमानतळ प्राधिकरणाला या वर्षीच्या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळाला आहेकारण याचा फायदा केवळ संपूर्ण प्रदेशातील हवाई वाहतूक उद्योगालाच होणार नाही, तर ज्ञान आणि सहकार्याच्या  देवाण-घेवाणीद्वारे भारताच्या हवाई क्षेत्राची वाढही होईल, यावर आमचा दृढ विश्वास आहे.

सीएएनएसओ

सीएएनएसओ- नागरी हवाई वाहतूक सेवा संस्था, हवाई वाहतूक व्यवस्थापन (एटीएम) उद्योगाचे जागतिक स्तरावरचे व्यासपीठ आहे आणि ते आपल्या भविष्यातील आकाशाला आकार देत आहे. याचे सदस्य जगातील 90% पेक्षा जास्त हवाई वाहतुकीला समर्थन देतात. यामध्ये हवाई वाहतूक सेवा पुरवठादार, हवाई क्षेत्र वापरकर्ते आणि संचालक, उत्पादक आणि हवाई वाहतूक उद्योग पुरवठादार यांचा समावेश आहे. ही संस्था ज्ञान, कौशल्य आणि नवोन्मेष शेअर करण्यासाठी उद्योगांना एकमेकांशी जोडून जागतिक हवाई वाहतूक व्यवस्थापनाच्या कामगिरीवर देखरेख ठेवते.        

भारतीय विमानतळ प्राधिकरण

भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय), आयसीएओ द्वारे भारतासाठी निश्चित करण्यात आलेले भारतीय उपखंडातील हवाई क्षेत्र आणि लगतच्या महासागरीय हवाई क्षेत्रामध्ये हवाई वाहतूक सेवांची तरतूद करण्यासाठी जबाबदार आहे. एएआय भारतातील प्रमुख विमानतळ ऑपरेटर (संचालक) म्हणून देखील काम करते. या अंतर्गत ते 133 विमानतळांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. यात 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 78 देशांतर्गत विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ आणि 21 नागरी विमानतळांचा समावेश आहे. देशभरातली हवाई संपर्क सक्षमता वाढवणे आणि किफायतशीर, आधुनिक, सुरक्षित विमानतळ ऑपरेशन्स आणि हवाई वाहतूक सेवांसाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाबाबत जागरूक संस्था बनणे, या अभियानासह जगातील आघाडीचे विमानतळ विकासक, ऑपरेटर आणि हवाई वाहतूक सेवा पुरवठादार बनणेहा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा दृष्टीकोन आहे.

 

 S.Thakur/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1872701) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi