संरक्षण मंत्रालय
नौदल कमांडर्स परिषदेचे 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान आयोजन
Posted On:
29 OCT 2022 3:08PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या कमांडर्सच्या दुसऱ्या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली इथे येत्या 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. नौदलातील कमांडर्सना संस्थात्मक व्यासपीठावर महत्वाचे सागरी विषय लष्करी आणि डावपेचात्मक स्तरावर चर्चा करण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल. भारतीय महासागर प्रदेशातील(आयओआर) तसेच जगाच्या इतरही भागातील सुरक्षा विषयक परिस्थितीत वेगाने घडणाऱ्या घडामोडी आणि बदलांच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचे स्वतःचे असे महत्व आणि प्रासंगिकता आहे.
भारताचे नौदलप्रमुख, नौदलातील इतर कमांडर्सबरोबर ज्या विषयांवर चर्चा करणार आहेत, त्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या प्रमुख कार्यान्वयन विषयक, सामग्रीविषयक, पुरवठा साखळी, मनुष्यबळ विकास, प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रम यांचा आढावा घेतला जाणार असून महत्वाचे उपक्रम आणि पुढाकारांबाबत पुढील विस्तृत चर्चा केली जाणार आहे. भूप्रदेशातील धोरणात्मक स्थितीचे प्रेरक घटक आणि त्यांना हाताळण्यासंदर्भात नौदलाची पूर्वतयारी यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
भारतीय नौदलाला लढाऊदृष्ट्या सुसज्ज, विश्वासार्हता असलेली आणि संलग्न अशी ताकद म्हणून तयार करण्यावर भर देण्यात आला असून तिची रूपरेषा भविष्यातील सज्जतेच्या दृष्टीकोनातून आखलेली आहे आणि ही ताकद तिच्यावर सोपवलेले दायित्व परिश्रमपूर्वक पार पाडू शकेल. भारताचे सागरी क्षेत्रातील हित वाढण्याबरोबर सुसंवाद कायम राखत भारतीय नौदलाने इतक्या वर्षांत कार्यान्वयनात महत्वपूर्ण वाढ झालेली पाहिली आहे. अलिकडच्या काळात, भारतीय नौदलाला सुरक्षाविषयक आवडता भागीदार म्हणून जो दर्जा प्राप्त झाला आहे, त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आयओआर क्षेत्रात आणि त्यापलिकडेही, उभ्या रहाणाऱ्या अनिश्चित अशा सर्व भू-डावपेचात्मक सागरी आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे.
या परिषदेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग मार्गदर्शन करतील आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवर नौदलाच्या कमांडर्सशी संवादही साधतील. सैन्यदल प्रमुख(चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) आणि भारतीय लष्कर तसेच भारतीय हवाई दलांचे प्रमुख सामान्य कार्यान्वयनविषयक पर्यावरणाच्या परिप्रेक्ष्यासंदर्भात तिन्ही लष्कराच्या शाखांमध्ये एककेंद्राभिमुखता आणण्यासंदर्भात नौदल कमांडर्सशी संवाद साधतील. तसेच लष्कराच्या तिन्ही सेवांमध्ये समन्वय वाढवण्याची क्षेत्रे आणि देशाचे संरक्षण तसेच भारतीय राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्याबाबत त्यांची सज्जता यावरही चर्चा केली जाईल.
***
R.Aghor/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1871803)