सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा अतुलनीय प्रवास आणि दृष्टीकोन यांच्यापासून प्रेरित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
Posted On:
28 OCT 2022 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022
केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे ख्यातनाम चित्रकार अकबर साहेब यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अकबर साहेबांची कला अद्वितीय म्हणावी लागेल कारण या प्रदर्शनातील सर्व पंचावन्न कलाकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा अतुलनीय प्रवास आणि त्यांच्या दृष्टीकोनापासून प्रेरित आहेत. राजीव मेनन यांनी रचना केलेले हे प्रदर्शन 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात ते जागतिक नेता होण्यापर्यंतचा प्रवास अकबर साहेबांनी आपल्या चित्रांमधून दाखवला आहे. या चित्रांमध्ये वस्तु आणि सेवा करासारख्या महत्वाच्या धोरणात्मक निर्णयांबरोबरच नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकचे रेखाटन करण्यात आले आहे, असे रेड्डी यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्यासमोरची आव्हाने आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी प्राप्त केलेले यश या चित्रांमधून दिसून येते, असेही ते म्हणाले. ही चित्रे महत्त्वाची आहेत कारण ती जगभरात नरेंद्र मोदी यांचा प्रभाव दाखवतात.






या प्रदर्शनातील चित्रांनी देशभरातील प्रत्येक भारतीयाच्या भावना प्रदर्शीत करण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या पुढाकारातून देशातील प्रत्येक सकारात्मक कामाचा उगम झाला आहे आणि असे प्रत्येक काम सर्वसामान्य माणसाच्या आकांक्षा आणि राष्ट्राच्या प्रगतीशी थेट जोडलेले आहे. आपल्या अद्वितीय चित्रांमधून भारतीयांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे, हा चित्रकार अकबर साहेबांचा एकमेव हेतू आहे.
सकारात्मक कामासाठी जनसमुदायाला एकत्र करणे तसेच स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया, मुद्रा योजना, जीवनाचा एक भाग म्हणून योगविद्येचा स्वीकार, खेड्यांचे विद्युतीकरण आणि गरीबांसाठी एलपीजी जोडणी अशा कार्यक्रमांचे सकारात्मक परिणाम यांचे चित्रण, अकबर साहेबांच्या चित्रांमध्ये दिसून येते. मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन तसेच पर्यटनाच्या वाढीच्या माध्यमातून देशाच्या सांस्कृतिक वारशाला मिळणारी जगन्मान्यता, याचे चित्रणही या चित्रांमध्ये दिसून येते.
S.Kane/M.Pange/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1871633)