शिक्षण मंत्रालय
आयआयआयटी नागपूरचा 28 ऑक्टोबर रोजी दुसरा दीक्षांत सोहळा
Posted On:
27 OCT 2022 2:34PM by PIB Mumbai
नागपूर, 27 ऑक्टोबर 2022
भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान नागपूर, (आयआयआयटी नागपूर) 28 ऑक्टोबर 2022 रोजी दुसरा दीक्षांत समारंभ साजरा करणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (आयआयआयटी नागपूर) ही संस्था भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने (पूर्वीचे मनुष्यबळ विकास मंत्रालय) सार्वजनिक-खाजगी भागीदारी योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या 20 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थांपैकी एक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) कायदा, 2017 च्या तरतुदींनुसार आयआयआयटी नागपूर ला “राष्ट्रीय महत्त्वाची संस्था” म्हणून घोषित करण्यात आले आहे.
आयआयआयटी नागपूरचा दुसरा दीक्षांत समारंभ 28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. बी.आर. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या मागील, गाव- वारंगा, बुटीबोरी, जिल्हा.- नागपूर येथील कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड चे संस्थापक-अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संस्थेला माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित सेवा क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
इंटरडिसिप्लिनरी शैक्षणिक अभ्यासक्रम हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना लघु पदवीका आणि पदवी अभ्यासक्रमांचे अनेक संयोजन उपलब्ध करून दिले जातात, जे त्यांना इंटरडिसिप्लिनरी विषय शिकण्याची संधी देतात.
संस्था कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मोठ्या संख्येने प्रतिष्ठित कंपन्यांना आकर्षित करत आहे आणि सोबतच विद्यार्थ्यांना सर्वात आशादायक प्लेसमेंट आणि इंटर्नशिप च्या संधी उपलब्ध करून देत आहे. 2022 च्या बॅचमध्ये 93 टक्के प्लेसमेंटसह संस्थेने उत्तम यश संपादित केले आहे. यात सर्वाधिक 40 लाख वार्षिक पॅकेज आणि 12 लाखांचे सरासरी वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात संस्थेला यश आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून चार नवीन शाखा आणि विद्यमान दोन शाखा मिळून संस्थेकडे सुमारे 1200 विद्यार्थी अपेक्षित आहेत. आतापर्यंत, संस्थेला यूजी, पीजी डिप्लोमा धारक आणि पीएचडी स्कॉलर्सच्या रूपात 460 हून अधिक माजी विद्यार्थी मिळाले आहेत.
आयआयआयटी नागपूर, सामाजिक क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहे. संस्थ्येने एचसीएल फाउंडेशन आणि आरोहा या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्य हाती घेऊन परिसरात 900 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली आहेत.
संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात 4 पी.एच.डी, 142 बी. टेक., 70 इन्फॉर्मशन अँड कम्युनिकेशन टेकनॉलॉजी मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा प्रदान करण्यात येतील. दीक्षांत सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सुश्री आयुषी टंडन (CGPA: 9.37) आणि श्री अरुण दास (CGPA: 9.36) यांना अनुक्रमे इन्स्टिट्यूट अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड आणि अवॉर्ड ऑफ मेरिट प्रदान करण्यात येईल.
आयआयआयटी नागपूर संस्थेकडून बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग), बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग), बी.टेक. CSE (ह्यूमन कॉम्प्यूटर इन्टेरॅक्शन अँड गेमिंग टेकनॉलॉजी), बी;टेक. CSE (डेटा सायन्स आणि ऍनालीटीकस), बी.टेक. CSE (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग), बी.टेक. ECE (इंटरनेट ऑफ थिंग्ज), सीएसई आणि ईसीई फील्डमध्ये पी.एच.डी आणि मिलिटरी कॉलेज ऑफ टेली-कम्युनिकेशन इंजिनीअरिंग महू, एमपी यांच्या संयुक्त विद्यामाने माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील पीजी डिप्लोमा हे अभ्यासक्रम चालवले जातात.
राष्ट्रीय महत्वाची संस्थाने आणि केंद्रीय विद्यापीठे च्या श्रेणी अंतर्गत ARIIA 2021 च्या रँकिंग मध्ये प्रॉमिसिंग 8 वा क्रमांक मिळाला होता; संस्थेकडे 2 कोटी पेक्षा जास्त रिसर्च फंडिंग आहे. संस्थ्येच्या नावे एकूण सहा पेटंट आहेत तर, प्राध्यापकांद्वारे 100 पेक्षा अधिक जर्नल्समध्ये लिखाण करण्यात आले आहे.
* * *
PIB Nagpur | S.Rai/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1871243)
Visitor Counter : 195