कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
तळागाळात प्रभावी प्रशासन आणि सेवा वितरणासाठी 2023 पर्यंत देशातील 30 लाखांहून अधिक नागरी सेवेतील अधिकाऱ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन इत्यादींसारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान पोहोचवणार - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
21 OCT 2022 5:35PM by PIB Mumbai
तळागाळात प्रभावी प्रशासन आणि सेवा वितरणासाठी 2023 पर्यंत देशातील 30 लाखांहून अधिक नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन इत्यादींसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाईल आणि त्यांना प्रशिक्षित केले जाईल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत सांगितले. भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था (आयआयपीए) येथे, केंद्रीय प्रशिक्षण संस्था (सिटीआय) आणि राज्यस्तरीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांच्या (एटीआय ) प्रमुखांसाठी "उत्तम प्रशासनासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान" या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत समारोपाचे भाषण करताना ते बोलत होते. केंद्रीय प्रशिक्षण संस्था (सिटीआय), राज्यस्तरीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (एटीआय) आणि आयजीओटी -एमकेच्या (एकात्मिक सरकारी ऑनलाइन प्रशिक्षण-अभियान कर्मयोगी) माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेसह (एआय ) आधुनिक तंत्रज्ञान 30 लाख केंद्र आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जाईल, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
क्षमता बांधणी आयोगासह 25 केंद्रीय प्रशिक्षण संस्था, 33 राज्यस्तरीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आणि इतर नागरी सेवा प्रशिक्षण संस्था तसेच वाधवानी तंत्रज्ञान आणि धोरण संस्था (डब्ल्यूआयटीपी ) संयुक्तपणे हे भव्य अभियान राबवणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या माध्यमातून जीएसटी आणि प्राप्तिकर परताव्यासंदर्भातील फसवणूक शोधून काढता येऊ शकते. अॅनालिटिक्सच्या वापराद्वारे नोंदी आणि प्रमाणपत्रे आणि डेटा आधारित निर्णय घेणे सुरक्षित करता येईल, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. नागरी सेवेतील अधिकारी लवकरच हे तंत्रज्ञान दैनंदिन कामात आणि प्रशासनात वापरू शकतील, असे त्यांनी सांगितले.
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870194)
Visitor Counter : 177