वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतीय गुणवत्ता परिषदेच्या अध्यक्षपदी जक्षय शाह यांची नियुक्ती
Posted On:
21 OCT 2022 7:42PM by PIB Mumbai
क्रेडाई (CREDAI) चे माजी अध्यक्ष आणि सॅवी (Savvy) ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जक्षय शाह यांची भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (क्यूसीआय) अध्यक्षपदावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती झाली असून त्यांचा कार्यकाल 21 ऑक्टोबर 2022 रोजी सुरु होईल. विद्यमान अध्यक्ष, मॅकिन्से इंडियाचे माजी प्रमुख आदिल जैनुलभाई, यांचे उत्तराधिकारी आहेत. आदिल जैनुलभाई 2014 ते 2022 या आठ वर्षांच्या कालावधीसाठी क्यूसीआय च्या अध्यक्षपदावर कार्यरत होते.
जक्षय शाह यांची नियुक्ती, उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अफाट अनुभवाच्या आधारे करण्यात आली असून, हा अनुभव गुणवत्तेला चालना देण्यामध्ये योगदान देईल, तसंच ते क्यूसीआय च्या माजी अध्यक्षांनी प्रस्थापित केलेला गुणवत्तेचा वारसा पुढे नेतील. शाह यांनी 1996 मध्ये सॅव्ही ग्रुप या भारतातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा समूहाची स्थापना केली आणि भारतातील बांधकाम व्यावसायिकांची खासगी संस्था CREDAI चे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले. याशिवाय, ते अॅसोचेम (ASSOCHAM) च्या पश्चिम विभाग विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि 1 लाखापेक्षा जास्त औषधे आणि आरोग्य उत्पादने देणाऱ्या, फार्मा इझी एक्सलरेटर प्रोग्रामचे सल्लागार म्हणून काम करतात.
आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना शाह म्हणाले, “मला क्यूसीआय च्या अध्यक्षपदावर नियुक्त केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. आदिल जैनुलभाई यांचे क्यूसीआय मधील त्यांच्या उल्लेखनीय कार्यकाळाबद्दल, मी अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यांच्याकडून या पदाची सूत्र स्वीकारताना मी स्वतःला भाग्यवान समजतो. क्यूसीआय ही 1000 पेक्षा जास्त लोकांची दिमाखदार संस्था आहे, जे 140 कोटीहून जास्त भारतीय नागरिकांच्या जीवनाचा दर्जा सुधारत आहेत. भारताबद्दलच्या गोष्टींवर माझा दृढ विश्वास आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे की, 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं पंतप्रधानांचं स्वप्नं पूर्ण करण्यात क्यूसीआय महत्वाची भूमिका बजावेल. गुणवत्ता आणि प्रत्येक गोष्टीमधील विश्वासार्हता, म्हणजेच जगासाठी ‘मेड ईन इंडिया’ या आधारस्तंभांच्या मदतीने हे साध्य होईल.”
***
R.Aghor/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870077)
Visitor Counter : 304