गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज ग्वाल्हेर विमानतळाच्या राजमाता विजयाराजे सिंधिया टर्मिनलची केली पायाभरणी
अमित शाह यांनी केलं भूमिपूजन आणि 4 हजार 200 कोटी रुपयांच्या नळाद्वारे पाणीपुरवठा प्रकल्पांचं केलं लोकार्पण, तसच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केली घरं सुपूर्द
Posted On:
16 OCT 2022 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळाच्या राजमाता विजयराजे सिंधिया टर्मिनलची पायाभरणी केली. अमित शाह यांनी भूमीपूजन केलं आणि 4 हजार 200 कोटी रुपयांच्या नळा द्वारे पाणीपुरवठा प्रकल्पांचं लोकार्पण केलं, तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरं सुपूर्द केली. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, अलिकडेच देशातील 130 कोटी जनतेच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपार श्रद्धेनं महाकालाची पूजा केली. पूर्वीच्या सरकारांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगूनही भारताचा सांस्कृतिक वारसा भग्नावस्थेतच राहू दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अनुनयाचं राजकारण न करता आपल्या सर्व सांस्कृतिक मूल्यांचा समान आदर केला आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलं.
आज विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी म्हणजे एकप्रकारे सुरुवात झाली असून हे विमानतळ देशातील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक म्हणून ख्याती मिळवेल, असे अमित शाह म्हणाले. शहरं किंवा खेड्यातील प्रत्येक गरीबाला घर देण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर ठेवलं आहे. मागील सरकारनं मध्य प्रदेशातील सर्व योजना बंद केल्या होत्या, परंतु पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी सर्व योजना पुन्हा सुरू केल्या आणि 2024 च्या निर्धारीत लक्ष्यापूर्वी त्या पूर्ण करण्याचं वचन दिलं आहे, असही अमित शाह यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. केंद्रातील आधीच्या सरकारच्या कार्यकाळात दररोज 12 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधले जात होते, आज मात्र दररोज 37 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधले जातात. वर्षानुवर्षे सुटू न शकलेल्या अनेक समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडवल्या आहेत, असेही अमित शाह यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी नागरी विमान वाहतूक क्षेत्रातही उडान योजना आणली आणि आज द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधील हवाई वाहतुकीमुळे 10 दशलक्ष प्रवासी विमानाने प्रवास करत आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने पंतप्रधान मोदींनी आपल्या विशाल देशात 224 कोटी कोविड-19 लसी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागच्या अडीच वर्षांपासून गरिबांना मोफत रेशनही पुरवत आहे.
मोदींनी घरे, वीज, शौचालये आणि पाच लाख रूपयापर्यंतच्या आरोग्य सुविधा आणि 80 कोटी लोकांना मोफत रेशन पुरवले आहे, असं सांगत मध्यप्रदेशचा सर्वांगीण विकास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे ध्येय असल्याचेही त्यांनी अमित शाह यांनी नमूद केले.
R.Aghor/Ashutosh/Vikas/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1868370)
Visitor Counter : 209