विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतानं वैद्यकीय शिक्षणाचं एकात्मिक मॉडेल विकसित करण्याची वेळ आली आहे : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं मत
पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1916 मध्ये स्थापन केलेलं BHU(बनारस हिंदू विद्यापीठ), एकाच आवारात एकात्मिक वैद्यकीय शिक्षणासह एकात्मिक अध्यापनाचे एकमेव असे उदाहरण
Posted On:
16 OCT 2022 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2022
भारतानं वैद्यकीय शिक्षणाचं एकात्मिक मॉडेल विकसित करण्याची वेळ आली आहे, असं मत, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं. पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1916 मध्ये स्थापन केलेलं BHU(बनारस हिंदू विद्यापीठ), एकाच आवारात एकात्मिक वैद्यकीय शिक्षणासह एकात्मिक अध्यापनाचं एकमेव आहे, असंही ते पुढे म्हणाले.
बीएचयू आजच्या काळातलं बहुतेक सर्वात मोठं निवासी शैक्षणिक केंद्र आहे आणि यात एकाच आवारात अनेक वैविध्यपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, असं जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. त्याच वेळी चारित्र्य निर्माण आणि मार्गदर्शनावर लक्ष केंद्रित करण्यासाठीही हे विद्यापीठ कटीबद्ध आहे, असंही ते म्हणाले. जीवन विज्ञान, औषधशास्त्र, अभियांत्रिकी, कला, सामाजिक विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादींसह सर्व विषयांच्या विद्या शाखा इथे आहेत, असा उल्लेखही त्यांनी केला.
बीएचयू मधील वार्षिक दिन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ जितेंद्र सिंह बोलत होते. ते म्हणाले, बीएचयू मधील इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (IMS) या संस्थेत, आयुर्वेद तसच स्वदेशी वैद्यकीय पद्धती, अॅलोपॅथी आणि इतर आधुनिक किंवा पाश्चिमात्य औषधोपचार पद्धतींसह दंत विज्ञान, या सर्व वैद्यकीय विद्याशाखा आणि त्यांचा तज्ञ शिक्षकवर्ग उपलब्ध असल्यामुळे, विद्यापीठातील हे एक अनुपम असं वैद्यकीय केंद्र आहे. याच आवारात योग आणि आयुष अभ्यासक्रम सुरू करण्याचीही योजना आहे, असं जितेंद्र सिंह म्हणाले.
आयएमएस (IMS) ही भारतातील पहिल्या पाच वैद्यकीय संस्थांपैकी एक आहे, असे डॉ.जितेंद्र सिंग यांनी नमूद केले आणि ते म्हणाले, बीएचयु (BHU) मधील ही संस्था एकात्मिक आणि सर्वांगीण दृष्टिकोन दृढ करते. या संस्थेत विद्यार्थी एकाच परिसरात सर्व वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश करू शकतात.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या अविभाज्य आणि अद्वितीय गुणवैशिष्ट्यांविषयी अधिक तपशीलवार माहिती देताना डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की, विशेषत: कोविड महामारीनंतर भारताच्या वैद्यकीय क्षेत्राचे जगभरातून कौतुक होत आहे. ज्या वेळी जगभरातील वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड महामारीच्या संपूर्ण जगाला हादरवून सोडले, अशा वेळी भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांनी केवळ रातोरात या संकटाचा सामना करण्याची तयारीच केली नाही तर त्यांनी या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रशंसनीय अशी स्वत:ची पुनर्रचनाही केली आणि अनुसरण करण्याजोगा एक आदर्श जगासमोर निर्माण केला. एकात्मिक व्यवस्थेच्या सहाय्याने, भारताने केवळ पहिली डीएनए लस निर्माण केली नाही तर ती उर्वरित जगालाही दिली आहे, असेही ते म्हणाले.
साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या काळात भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात आपत्तीचा उद्रेक होईल आणि इतर देशांनाही त्यापासून धोका निर्माण होईल अशी भीती जगाला वाटत होती, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केंद्रित दृष्टीकोन आणि दिवसेंदिवस दिवसागणिक परिस्थितीचे केलेले अवलोकन यामुळे अशा कठीण परिस्थितीत भारताच्या निम्म्याहून कमी लोकसंख्या असलेल्या अनेक युरोपीय देशांच्या तुलनेत भारताने उत्तम कामगिरी केली, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
R.Aghor/Ashutosh/Vikas/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1868368)
Visitor Counter : 191