भारतीय स्पर्धा आयोग
भारतातील चित्रपट वितरण साखळीवरील बाजार अभ्यास
Posted On:
14 OCT 2022 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2022
‘भारतातील चित्रपट वितरण साखळीवरील बाजार अभ्यास: प्रमुख निष्कर्ष आणि निरीक्षणे’ या शीर्षकाखालील अहवाल भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय ) आज प्रसिद्ध केला.हा अभ्यास चित्रपट वितरण साखळीतील हितसंबंधितांनी ओळखलेल्या काही प्रमुख स्पर्धा समस्यांवर प्रकाश टाकतो. या अभ्यास अहवालात अभ्यास साखळीतील उत्पादन, वितरण किंवा प्रदर्शन स्तरावरील विविध संघटनांच्या भूमिकेवरील चर्चा मांडण्यात आली आहे. काही संस्थांची वरचढ वायदा शक्ती आणि परिणामी असमतोल; विविध स्तरांवर अस्तित्वात असलेले अडथळे; जोखमींचे असमान वितरण; महसूल वाटणी व्यवस्था;सिनेमातील नवीन तंत्रज्ञान;प्रदर्शन स्तरावरील बांधणी व्यवस्था इ. च्या अभ्यासातून मिळालेल्या निष्कर्षांनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार , विविध भागधारक श्रेणींसाठी काही स्वयं-नियामक उपाय योजण्याची शिफारस भारतीय स्पर्धा आयोगाने चित्रपट उद्योगाला केली आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाने चित्रपट निर्मिती, वितरण आणि प्रदर्शनाच्या विविध पैलूंबद्दल त्यांचा बहुमूल्य सूक्ष्म दृष्टीकोन मांडून विविध भागधारकांनी केलेल्या सहकार्याची प्रशंसा केली. नियामक हस्तक्षेप मर्यादित करण्याच्या अनुषंगाने .सर्वांच्या हितासाठी संबंधित घटकांद्वारे परस्पर विरोधी स्पर्धात्मक पद्धती समाविष्ट केल्या जातील, अशी प्रामाणिक अपेक्षा भारतीय स्पर्धा आयोगाने व्यक्त केली आहे .
S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1867897)
Visitor Counter : 242