आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 219 कोटी 15 लाख पेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या.


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 4 कोटी 11 लाखांहून अधिक पाहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 26,509

गेल्या 24 तासांत देशात 2,786 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.05% आहे

Posted On: 13 OCT 2022 9:43AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांची संख्या 219.15 कोटींवर (2,19,15,39,281) आहे.. 16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 11 लाखांहून अधिक (4,11,04,996) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.


आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415293

2nd Dose

10119809

Precaution Dose

7049964

FLWs

1st Dose

18436985

2nd Dose

17718153

Precaution Dose

13701961

Age Group 12-14 years

1st Dose

41104996

2nd Dose

32009908

Age Group 15-18 years

1st Dose

61974140

2nd Dose

53195854

Age Group 18-44 years

1st Dose

561352552

2nd Dose

516061306

Precaution Dose

98588987

Age Group 45-59 years

1st Dose

204040458

2nd Dose

197024817

Precaution Dose

49936055

Over 60 years

1st Dose

127675835

2nd Dose

123184640

Precaution Dose

47947568

Precaution Dose

21,72,24,535

Total

2,19,15,39,281

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 26,509 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.06% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 2,557 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,40,65,963 झाली आहे.


गेल्या 24 तासांत, देशात नव्या 2,786 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 2,57,965 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 78 लाखांहून अधिक (89,78,77,536) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.05% आहे 

आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.08% इतका नोंदला गेला आहे.

 ***

Gopal C/Vikas Y/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1867346) Visitor Counter : 211