उपराष्ट्रपती कार्यालय

लोकशाहीच्या उत्कर्षासाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी मानवाधिकार अत्यंत आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन

Posted On: 12 OCT 2022 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12  ऑक्टोबर  2022

लोकशाहीच्या उत्कर्षासाठी मानवी हक्क अत्यंत महत्वाचे असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले. प्रत्येक नागरिकाने इतरांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काम करावे, कारण ही त्यांच्या स्वतःच्या मानवी हक्कांच्या जतनाची सर्वात सुरक्षित हमी आहे असे आवाहन त्यांनी केले.   

नवी दिल्ली येथे आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) 30 व्या स्थापना दिना निमित्त आयोजित समारंभाला संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी समाजातील वंचित आणि असुरक्षित घटकांच्या मानवी हक्कांचे रक्षण केल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची प्रशंसा केली. माध्यमांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांना सार्वजनिक क्षेत्रात ठळकपणे प्रकाशित करावे असे  आवाहन त्यांनी केले, कारण देशाच्या मानवी हक्कांबाबतच्या उद्दिष्टाला प्रोत्साहन द्यायला ते मोठी मदत करेल. .

मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वसमावेशक विकास अत्यावश्यक असल्याचे नमूद करून धनखड यांनी अलीकडच्या काळातील, विशेषतः आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रातील  मानवाधिकारांची जोपासना करणाऱ्या विविध प्रशासकीय प्रणालीगत सुधारणा आणि सकारात्मक उपाययोजनांची प्रशंसा केली. 

'

तटस्थता अत्याचार करणाऱ्याला मदत करते, अत्याचाराला बळी पडणार्‍यांना कधीच नाही, हे निरीक्षण लक्षात घेऊन, मानवाधिकारांचा ऱ्हास होत असताना आपण योग्य पक्ष घेतलाच पाहिजे, यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. मौन छळ करणाऱ्याला प्रोत्साहन देते, बळी पडणाऱ्याला कधीच नाही. अशा परिस्थितीत सक्रीय होण्याशिवाय पर्याय नाही आणि आपण हस्तक्षेप केलाचं पाहिजे, ते पुढे म्हणाले.

आपल्या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून सर्व सजीवांच्या हक्कांचा आदर करून एकोप्याने जगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.

 S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1867246) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam