दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल विभागाकडून ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’निमित्त् विविध कार्यक्रमाचे आयोजन
राष्ट्रीय पातळीवर 4.5 लाखांहून अधिक बचत खाती उघडण्याचे टपाल विभागाचे ध्येय
Posted On:
10 OCT 2022 7:11PM by PIB Mumbai
गोवा, 10 ऑक्टोबर 2022
गोवा टपाल विभाग राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करत आहे. 09 ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी आर्थिक सशक्तीकरण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त बचत खात्यांसंबधी जनजागृती केलेल्या तसेच टपाल विभागाच्या दैनंदिन कामकाजात सरस कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पोस्ट मास्तर जनरल सय्यद रशीद यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. सर्व कर्मचाऱ्यांनी अशीच तत्पर सेवा द्यावी, असे रशीद म्हणाले. टपाल कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त नागरिकांना बचत खात्यांविषयी माहिती देऊन त्यांना खाते खोलण्यास मदत करावी, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताहात देशपातळीवर 4.5 लाख खाती उघडण्यात आली होती, यापैकी 1.5 लाख खाती, ही लघु बचतीची होती. यावर्षी विभागाकडून यापेक्षाही जास्त खाती खोलण्यात यावी असे प्रयत्न सुरु आहेत, असे ते म्हणाले.
टपाल सप्ताहात 11 ऑक्टोबर रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेअंतर्गत फिलाटेली दिवस साजरा करण्यात येईल. 12 ऑक्टोबर रोजी वस्तू आणि पार्सल दिवस आणि 13 ऑक्टोबर रोजी अंत्योदय दिवस साजरा करण्यात येईल. तसेच आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण यासंदर्भात नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
* * *
PIB Panaji | GSK/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866576)
Visitor Counter : 145