युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय क्रीडास्पर्धा दृष्टीक्षेपः श्रीहरी नटराजने 100 मीटर फ्रीस्टाईल जलतरणमध्ये सहावे सुवर्ण पदक जिंकून आपल्या मोहिमेची केली शानदार सांगता

Posted On: 09 OCT 2022 1:56PM by PIB Mumbai

 

कर्नाटकचा ऑलिंपिकपटु श्रीहरी नटराज याने राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत 100 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सहावे सुवर्ण पदक जिंकून आपल्या मोहिमेची शानदार सांगता केली. राजकोट येथील सरदार पटेल जलतरण स्पर्धा संकुलात नटराजन याने 50.41 सेकंदात अंतर पार करून राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये नवा विक्रम नोंदवला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001F4Y3.jpg

गेल्या आठवड्यात नटराज हा आपले वरिष्ठ खेळाडू केरळच्या साजन प्रकाशने 5 सुवर्ण,  2 रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकण्याच्या केलेल्या कामगिरीचा साक्षीदार ठरला. आज नटराज याने 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये एखाद्या  झंझावातासारखा घुसून स्पर्धा जिंकली तर साजन प्रकाश सातवा आला. श्रीहरीने फ्रीस्टाईल बॅकस्ट्रोक स्पर्धेत 2 सुवर्ण जिंकून त्यात 2 स्प्रिंट फ्रीस्टाईल सुवर्ण पदकांची भर घातलीच शिवाय कर्नाटकला रिले पथकाला 2 सुवर्ण जिंकून दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002IL10.jpg

ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात एस पी लिखित याने पुरूषांच्या स्पर्धेत 100 मीटरमध्ये तीन सुवर्ण पदके जिंकून सर्वंकष यश मिळवले आणि त्यामुळे सर्व्हिसेस संघाला आतापर्यंतच्या त्यांच्या सुवर्ण पदकांची संख्या 44 वर नेऊन पोहचवण्यास सहाय्य केले.  त्याचबरोबर, 30 सुवर्ण पदके जिंकून दुसर्या स्थानावर असलेल्या हरियाणातील अंतर वाढवले. महाराष्ट्राने हरियाणाला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असून त्यांच्याकडे हरियाणापेक्षा केवळ दोन सुवर्ण पदकं कमी आहेत.

कर्नाटक आता 23 सुवर्ण पदके घेऊन चौथ्या स्थानावर असून त्यात 19  जलतरण प्रकारातील आहेत. तामिळनाडू पदक तक्त्यात एकमेव सुवर्ण पदक जिंकून पाचव्या स्थानावर असून त्याने 4  बाय 100 मेडले रिले या जलतरणच्या अंतिम क्रीडाप्रकारात कर्नाटकचा पराभव केला होता.

सॉफ्ट टेनिसच्या अंतिम सामन्यामध्ये गुजरातच्या पुरूष संघाने मध्यप्रदेशविरोधात 2-0 असा विजय मिळवून यजमान राज्याने आतापर्यत अभूतपूर्व अशा संख्येने म्हणजे 11 सुवर्ण पदके जिंकली आहेत. हा सामना अहमदाबाद येथील साबरमती रिव्हरफ्रंट क्रीडा संकुलात झाला. आज सकाळी यजमान संघाला महिला ट्रायथलॉनमध्ये प्रज्ञा मोहन हिच्या कामगिरीच्या जोरावर सुवर्ण पदक जिंकून पदकांची संख्या वाढवण्याची आशा आहे.

दरम्यान, गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे  ज्युदो स्पर्धेत 81 किलो प्रकारात दिल्लीच्या मोहित शेरावत याने सुवर्ण पदक जिंकले. हे यश त्याने उजवा खांदा दुखावला असतानाही उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत सामने जिंकून मिळवले हे विशेष.  राष्ट्रीय विजेता शेरावतचा उपउपांत्य फेरीत पंजाबच्या सरबजीत सिंग बरोबर लढताना उजवा खांदा दुखावला होता.

गुजरातची राजधानीच्या पूर्वेकडील महामार्गावरील सायकलिंग स्पर्धेत कर्नाटकचा दिग्गज सायकलपटु नवीन जॉन याने अत्यंत वेगाने पायडल मारून पुरूष एकेरी स्पर्धेच्या विजेते पद कायम राखले. तर मणिपूरची तोंगब्राम मनोरमा हिने ताप आणि डोकेदुखीवर मात करत छायानिका गोगोई (आसाम) आणि पूजा बबन दानोळे (महाराष्ट्र) यांना मागे टाकून 85 किलोमीटर रस्ते शर्यतीत सुवर्ण जिंकले.

सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र यांनी राजकोट येथील सरदार पटेल जलतरण संकुलात वॉटर पोलो स्पर्धेत पुरूष आणि महिलांचे सुवर्ण पदक जिंकले. सर्व्हिसेसने पुरूषांच्या शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या लढतीत अखेरच्या क्षणी दोन गोल करून केरळचा 10-8 ने पराभव केला तर महाराष्ट्राच्या महिलांनी शेवटच्या राऊंज रॉबिन सामन्यात केरळचा 5-3 ने पराभव करून विजेतेपद जिंकले.

तामिळनाडूच्या एस वैष्णवीने महिलांच्या कलात्मक योगासना स्पर्धेत 134.22 गुण घेऊन सुवर्णपदक जिंकले तर तिच्या समवेत महाराष्ट्राची दुक्कल छकुली बन्सीलाल सेलोकर (127.68) आणि पूर्वा श्रीराम किनरे (126.68) या मंचावर होत्या. कांस्य पदक जिंकून पूर्वाला अतीव समाधान झाले असेल कारण दहावी आणि शेवटची पात्र खेळाडू म्हणून तिने अंतिम फेरीत धडक मारली होती.

राजकोट येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या  पुरूष हॉकीमध्ये कर्नाटकने यजमान गुजरातचा 11-2  असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली जेथे त्यांचा सामना तामिळनाडूला 3-0  ने हरवून त्यांना स्पर्धेबाहेर करणार्या हरियाणाशी होईल. उत्तरप्रदेशने नियमित खेळात पश्चिम बंगालविरोधात चित्तथरारक 1-1 अशी बरोबरी झाल्यावर पेनल्टी शूट आऊटमध्ये बंगालला हरवले. उत्तरप्रदेशची लढत आता शेवटच्या उपांत्यपूर्व  सामन्यात झारखंडला हरवणार्या महाराष्ट्राबरोबर होईल.

गुजरातचे 4 मुष्टीयोद्धे असिफ अली असगर अली सय्यद( 57 किलो ), मीनाक्षी भानुशाली (57 किलो), परमजीत कौर (66  किलो) आणि रूचिता राजपूत (75 किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. माजी राष्ट्रीय विजेता कृष्णा थापा ज्याला काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये राज्याच्या संघावर देखरेख ठेवण्याचे काम सोपवले होते, त्याने हा उत्साहजनक क्रीडास्पर्धांमुळे  गुजरातच्या मुष्टीयुद्ध खेळात नवीन चैतन्य ओतले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003W1UO.jpg

निकाल

जलतरण (पुरूष)

100 मीटर फ्रीस्टाईल 1. श्रीहरी नटराजन(कर्नाटक)  50.41 सेकंद (राष्ट्रीय क्रीडास्पर्धेतील नवीन विक्रम)  जुना विक्रमः आरोन डिसूझा, थिरूवनंतपुरम 50.97 सेकंद (2015).2 विशाल ग्रेवाल(दिल्ली) 51.41. 3. आनंद, (सर्व्हिसेस) 52.06

100 मी. ब्रेस्टस्ट्रोक 1. एस पी लिखित(सर्व्हिसेस) 1:02.77 2. एस दानुश (तामिळनाडू) 1:03.95 3. अनूप ऑगस्टीन (केरळ) 1:05.42

महिला

100 मीटर फ्रीस्टाईल 1. शिवांगी शर्मा (आसाम) 58.77 सेकंद  2. माना पटेल(गुजरात) 59.15 3. एस रूजुला (कर्नाटक) 59.17

100 मी. ब्रेस्टस्ट्रोक 1. चाहत अरोरा (पंजाब) 1:14. 42(राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधील नवीन विक्रम) जुना विक्रम संजी शेट्टी, बंगलुरू 1997 1:17.35  आरती पाटील (महाराष्ट्र) 1:18.72

संमिश्र

4 बाय 100 मिडली रिले  1.  तामिळनाडू (रोहित बेनेडिक्टन, मान्या मुक्ता, एस दानुश, बी शक्ती) 4:11.08 2. कर्नाटक 4:12.30 3. गुजरात 4:13.31

 

वॉटर पोलो

पुरूषः सर्व्हिसेसकडून केरळ पराभूत. कांस्यपदकासाठी झालेल्या प्ले ऑफ मध्ये महाराष्ट्राने पश्चिम बंगालला 8-7 ने हरवले.

महिला (साखळी पद्धतीने स्पर्धा) 1.  महाराष्ट्र 2. पश्चिम बंगाल 3. केरळ

 

सायकलिंग

पुरूष 38 वैयक्तिक समय परीक्षण 1.  नवीन जॉन (कर्नाटक) 49:01.635 2. अरविंद पन्वर (उत्तरप्रदेश) 50:30.733  3. जोएल संतोष सुंदरम 50:42.114

महिला 85 किलोमीटर रोड रेस 1. तोंगब्राम मनोरमा देवी (मणिपूर) 2. छायानिका गोगोई (आसाम)  3. पूजा बबन दानोळे (महाराष्ट्र)

 

ज्युडो

पुरूष

73 किलोग्राम गटः विशाल रूहील(हरियाणा) ने हरियाणाच्याच जतीनला पराभूत केले. कांस्यपदकः प्रदीप रावत (उत्तराखंड) आणि विकाश दलाल (हरियाणा)

81 किलोग्राम गटः मोहित शेरावत(दिल्ली) ने हर्षप्रीत सिंग(पंजाब) ला पराभूत केले. कांस्यपदकः स्नेहल रमेश खावरे  (महाराष्ट्र) आणि एल नंगीथोल चानू (मणिपूर)

महिला

52 किलोग्राम गटः लाल हुमहिमी(मिझोराम)ने पिंकी बलहारा(दिल्ली) ला पराभूत केले. कांस्यपदकेः स्नेहल रमेश खावरे(महाराष्ट्र) आणि एल नुंगीथोल चानू (मणिपूर)

57 किलोग्राम गटः यामिनी मौर्या (मध्यप्रदेश) ने सावित्री(हरियाणा) ला पराभूत केले. कांस्यपदकेः एल बेमबेम देवी (मणिपूर) आणि सुचिका तारीयाल (हरिय़ाणा)

 

सॉफ्ट टेनिस

पुरूषः गुजरातने मध्यप्रदेशला 2-0 असे हरवले

महिलाः तामिळनाडूने गुजरातला 2-0 ने हरवले.

 

वुशु ताओलू

पुरूष ताईचिक्वान आणि ताजिजिआन 1. एम ग्यानदास सिंग (सर्व्हिसेस) ताचिक्विआन 9.58 गुण 9.50 गुण एकूण 18.98 गुण 2. सानमा ब्रम्हा (आसाम) 9.20, 9.05, 18.25 3. अभिषेक मेहतो (दिल्ली) 8.15, 8.80, 16.95

महिला ताईचिक्वान आणि ताजिजिआन 1. मेपंग लांबू (अरूणाचल प्रदेश) 9.05,8.85, 17.90 2. रालू बू(अरूणाचल प्रदेश) 8.25, 8.15, 16.40 3. श्रावणी सोपान कटके (महाराष्ट्र) 8.50, 7.80, 16.30

 

योगासने

कलात्मकः 1. वैभव वामन श्रीरामे (महाराष्ट्र) 136.52  गुण 2.  आदित्य प्रकाश जंगम(कर्नाटक) 134.71 3. प्रवीण कुमार पाठक (हरियाणा) 133.35

महिला

कलात्मक 1.  वैष्णवी (तामिळनाडू) 134.22 गुण 2. छकुली बन्सीलाल सेलोकर 127.68  3.  पूर्वा शिवराम किनारे (महाराष्ट्र) 126.68

 

इतर निकाल

फुटबॉल महिला उपांत्य सामना मणिपूरने आसामला 5-0 ने पराभूत केले.

 

गोल्फ

पुरूष तीन फेर्यांनंतर आघाडी) करनदीप कोचर (चंडीगढ) 199(68,66,65)  अभिनव लोहान(हरियाणा) 206 (68,66,72) इशान चौहान(महाराष्ट्र) 211(71,72,68) सुनहित बिश्नोई(हरियाणा) 211(73,69,69) अर्जुन भाटी(उत्तरप्रदेश) 212 (72,70,70) आर्यन रूपा आनंद (कर्नाटक) 214( 72,72,20)

महिला (तीन फेर्यांनंतर आघाडी) अमनदीप कौर(पंजाब) 212(72,69,71) अवनी प्रशांत (कर्नाटक) 216(71,74,71); निशा हेमेश पटेल(महाराष्ट्र) 222(74,68,80); पुनीत कौर बाजवा(पंजाब) 224(75,74,74) ; वाणी कपूर(दिल्ली) 224(75,74,75); सेहेर कौर अतवाल(दिल्ली)  224(76,77,71)

 

हॉकी

पुरूष उपांत्यपूर्वः कर्नाटकने गुजरातला 11-2 ने हरवले (मध्यांतरापर्यंत 6-1); हरियाणाने तामिळनाडूला 3-0 (1-0) ने हरवले; उत्तरप्रदेशने पश्चिम बंगालचा 1-1 (1-0)  बरोबरी झाल्यावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4  ने पराभूत केले. महाराष्ट्रने झारखंडला 3-1(2-0) ने हरवले.

 

सॉफ्टबॉल

पुरूष

गट क्षः महाराष्ट्राने मध्यप्रदेशला 9-0ने हरवले तर दिल्लीने गुजरातवर 11-0 असा विजय मिळवला. मध्यप्रदेशने गुजरातला 13-0 असे पराभूत केले.

गट यः छत्तीसगढने आंध्रप्रदेशला 2-0  ने हरवले तर हरियाणाने चंडीगढला 1-0 ने (टाय़ब्रेकरद्वारे) पराभूत केले . छत्तीसगढने हरियाणाला 2-0 असे पराभूत केले.

महिला

गट क्षः केरळने दिल्लीला 5-3ने तर छत्तीसगढने गुजरातला 11-0 असे हरवले. दिल्लीने गुजरातला 8-0 ने पराभूत केले

गट यः पंजाबने महाराष्ट्राने 1-0 ने हरवले तर तेलंगणाने मध्यप्रदेशला 13-0 ने पराभूत केले.

टिपः कालच्या रात्रीच्या सामन्यांत, पुरूषांच्या 50 मीटर जलतरण बॅकस्ट्रोकमध्ये  विजेत्याचा कालावधी चुकीने नोंदवला गेला जो 25.65 असा हवा होता. योग्य निकाल असाः पुरूषांच्या बॅकस्ट्रोकमध्ये 1. श्रीहरी नटराजन 25.65 सेकंद (नवीन राष्ट्रीय विक्रम) जुना विक्रम (श्रीहरी नटराज, राजकोट,2022)  2. व्ही विनायक (सर्व्हिसेस) 26.72  एस शिवा (कर्नाटक) 27.11

***

M.Jaybhaye/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866219) Visitor Counter : 245


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil