आयुष मंत्रालय
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि राष्ट्रीय प्रगत औद्योगिक विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, जपान यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
07 OCT 2022 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2022
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी भारतातील आयुर्वेदाची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि राष्ट्रीय प्रगत औद्योगिक विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था,(AIST) जपान यांनी शैक्षणिक आस्थापनेसाठी सामंजस्य करार केला आहे.राष्ट्रीय प्रगत औद्योगिक विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, जपान ही संस्था जपान मधील एक प्रतिष्ठित आणि सर्वात मोठ्या सार्वजनिक संशोधन संस्थांपैकी एक आहे ही संस्था तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक गोष्टी आणि व्यावसायिकता यामध्ये सेतूचे काम करून त्यांच्यातील अंतर कमी करते. या सामंजस्य करारावर प्रा. तनुजा नेसारी (संचालक, AIIA) आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित असलेले डॉ. तमुरा तोमोहिरो(महासंचालक, जीवन विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विभाग), यांनी स्वाक्षरी केली.
ज्यांचे प्रयत्न हे सहकार्य प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहेत त्या मुख्य वरिष्ठ संशोधक, रेणू वाधवा ज्या AIST-भारत DAILAB, जीवन विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख आहेत,त्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. इतर मान्यवर जे यावेळी उपस्थित होते त्यात डॉ. मनोज नेसारी-सल्लागार, आयुष मंत्रालय; डॉ. चिबा- संचालक, एआयएसटी, जपान; डॉ. ओहमिया योशिहिरो-प्रमुख वरिष्ठ संशोधक, एआयएसटी; डॉ सुनील कौल-निमंत्रित ज्येष्ठ संशोधक, जीवन विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान AIST विभाग; श्रीमती शीला टिर्की -MoA च्या प्रतिनिधी इत्यादींचा समावेश होता.
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात AIIA चा उद्देश संस्थेच्या संशोधन उपक्रमांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्याचा आहे. या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांना पारंपरिक औषधांच्या भारतीय आयुर्वेदिक प्रणालीच्या क्षेत्रात संशोधन सहयोग आणि क्षमता निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळेल. हे सर्व उपक्रम आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातील.
AIIA चे युरोपियन अकॅडमी ऑफ आयुर्वेद, बर्नस्टीन, जर्मनी, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया; ग्राझ मेडिकल युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रिया; कॉलेज ऑफ मेडिकल, यूके; लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन, यूके आणि फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जानेरो, ब्राझील यांच्या सोबत आधीच सामंजस्य करार अस्तित्वात आहेत.
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865949)
Visitor Counter : 206