नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

नवी दिल्ली येथे 17 ते 20 ऑक्टोबर 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे पाचवे अधिवेशन


आर. के सिंह अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पाचव्या अधिवेशनात 109 देशांचे नेते उपस्थित राहणार

ऊर्जा उपलब्धता , ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा संक्रमण या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरील प्रमुख उपक्रमांवर या अधिवेशनात चर्चा होणार

Posted On: 06 OCT 2022 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2022

 

नवी दिल्ली येथे  17 ते 20 ऑक्टोबर 2022 दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे पाचवे अधिवेशन आणि अन्य संबंधित कार्यक्रमांच्या पूर्वतयारीची सुरवात केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी आज एका कार्यक्रमाच्या माध्यमातून केली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अधिवेशनाचे  अध्यक्षपद भारताकडे आहे. या बैठकीत 109 सदस्य आणि स्वाक्षरी करणाऱ्या देशांचे मंत्री, शिष्टमंडळ आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. केंद्रीय ऊर्जा तसेच नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवतील.

ऊर्जा संक्रमणावरील आंतरराष्ट्रीय संकल्प  पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हे  आवश्यक माध्यम आहे, असे यावेळी बोलताना मंत्र्यांनी सांगितले.

हे अधिवेशन म्हणजे प्रत्येक सदस्य देशाचे प्रतिनिधित्व असलेली  आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची  सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था  आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या  चौकटीसंदर्भातील  कराराच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेते आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समन्वित कृती करते. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या ठिकाणी  मंत्री स्तरीय अधिवेशनाची दरवर्षी  वार्षिक बैठक होते.सौरऊर्जा, कामगिरी, विश्वासार्हता, खर्च आणि आर्थिक  प्रमाणाच्या उपयोजनांच्या  दृष्टीने कार्यक्रम आणि इतर उपक्रमांच्या एकूण परिणामाचे मूल्यांकन ही बैठक करते.

ऊर्जा उपलब्धता, ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा संक्रमण या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरील प्रमुख उपक्रमांवर या पाचव्या अधिवेशनात चर्चा होणार आहे.सर्वात कमी विकसित देश आणि विकसनशील छोटे द्वीप देश सदस्य देशांसाठी कार्यक्रमात्मक पाठबळ, सर्व विकसनशील सदस्य देशांना क्षमता बांधणीसाठी समर्थन आणि सर्व सदस्य देशांना विश्लेषण आणि सल्लागार पाठबळ यासाठीच्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या  धोरणात्मक योजनेवर देखील आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतील सदस्य देशांमधील जागतिक नेते चर्चा करतील.

सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी 5व्या अधिवेशनात  देशांमध्‍ये अधिक सहमती  होण्याची अपेक्षा आहे. वाढलेले आंतरराष्ट्रीय सहकार्य हा ऊर्जा संक्रमणाचा कणा असेल, गुंतवणुकीला चालना देईल आणि हवामानासंदर्भातील कृतीच्या या महत्त्वपूर्ण दशकात लाखो नवीन रोजगार निर्माण करेल.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या कार्यालयाने 19 ऑक्टोबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या विविध धोरणात्मक उपक्रमांवर आधारित तांत्रिक सत्रांची मालिका  आणि भागीदार संस्थांच्या सहकार्याने सौर आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील विविध उदयोन्मुख समस्यांवर तांत्रिक सत्रे आयोजित केली आहेत.  5व्या महासभेनंतर, तीन विश्लेषणात्मक अहवाल देखील सादर केले जातील, ते म्हणजे:

  • जागतिक सौर तंत्रज्ञान अहवाल
  • जागतिक सौर बाजारपेठ अहवाल
  • जागतिक सौर गुंतवणूक अहवाल

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865694) Visitor Counter : 301


Read this release in: English , Urdu , Hindi