उपराष्ट्रपती कार्यालय
लाल किल्ला मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्याला उपराष्ट्रपती उपस्थित
Posted On:
05 OCT 2022 8:29PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांनी आज नवी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर श्री धार्मिक लीला समितीने आयोजित केलेल्या दसरा महोत्सवात भाग घेतला.
भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दिल्लीतील हा आपला पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असून सर्वांनी दाखवलेले प्रेम आणि आपुलकी पाहून भारावून गेल्याचे उपराष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाले.
रामराज्याच्या अर्थाप्रमाणे आज राक्षसी आणि विध्वंसक शक्तींचा पराभव होत आहे आणि या शक्तींवर चांगुलपणाचा विजय होत आहे.
रामलीला आयोजकांकडून उपराष्ट्रपतींना भेट स्वरूपात गदा देण्यात आली. शांततेचे प्रतीक असलेली पांढरी कबूतरे उपराष्ट्रपतींनी आकाशात सोडली. त्यानंतर, त्यांनी धनुष्य हाती धरले आणि रावण दहन (पुतळा दहन) प्रसंगी प्रतीकात्मक बाण सोडला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सिन्हा, खासदार डॉ. हर्षवर्धन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865457)
Visitor Counter : 178