इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल: राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर


पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संधींचे आणि भांडवलाचे लोकशाहीकरण

धोलेरा होणार सेमीकॉन केंद्र, गुजरातच्या तंत्रज्ञान दशकाचा (टेकेडचा) मार्ग प्रशस्त करेल

Posted On: 04 OCT 2022 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृतीशील धोरणे आणि भारतात 5जी  सेवेचा आरंभ या प्रयत्नात तरुणाईचा  मोठा वाटा असून भारत लवकरच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात एक नेतृत्व  म्हणून उदयाला  येईल, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज गुजरातमधील राजकोट येथे सांगितले.

''आपल्या  तरुण भारतीयांचे  कठोर परिश्रम, जिद्द आणि उद्योगांद्वारे पंतप्रधान मोदी यांचा  भारताच्या तंत्रज्ञान दशकाचा  ( टेकेडचा)  दृष्टीकोन   साकार करता येईल.

डिजिटल इंडिया, स्किल इंडिया इत्यादीसारख्या उपक्रमांद्वारे भारत सामर्थ्यशाली बनू शकते.”, असे चंद्रशेखर यांनी राजकोटमधील सौराष्ट्र विद्यापीठ आणि आत्मीय विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

सेमी कंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता , मशिन लर्निंग, ब्लॉकचेन इत्यादी   मधील गुंतवणूकीद्वारे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला  “सखोल आणि व्यापक ” प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे यावर भर देत मंत्री म्हणाले की,  "या उद्देशासाठी, सेमी-कंडक्टर डिझाइन क्षेत्रात  गुंतवणूक करण्यासाठी सरकार 100 कोटी रुपयांपर्यंत  अनुदान देण्यासाठी  तयार आहे."

उद्योजकांना संधी मिळवून देण्याच्या अनुषंगाने, प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच देशाच्या विविध भागात रोड शो करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयात कमी करण्यासह केवळ वस्तूंचे निर्यातदार न राहता  पुरवठा आणि मूल्य साखळींचे मूल्य निर्माते बनवण्याचे  उद्दिष्ट  धोरण आहे असे, चंद्रशेखर यांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील गुजरातने  सुरु केलेल्या उपक्रमांचा  संदर्भ देत  चंद्रशेखर म्हणाले की, गुजरात राज्याने स्वतःचे सेमिकॉन धोरण जाहीर करणे आणि धोलेरा आशियातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून स्थापित करणे यासारख्या अनेक कृतीशील उपाययोजना केल्या आहेत."धोलेरा गुजरात मधील उद्योजकांसाठी अनेक संधी घेऊन येईल."

केवळ प्रभावशाली आणि चांगले नेटवर्क असलेल्यांना अनुकूल अशी भारत एक निष्क्रिय, भ्रष्ट आणि कमी विकास असेलली अर्थव्यवस्था आहे असे कथन करणाऱ्या जुन्या कहाण्या पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने संपुष्टात आणल्या आहेत, असे सांगत आजच्या भारतात संधीचे  आणि भांडवलाचे लोकशाहीकरण झाले आहे . कमाल सुशासन  आणि किमान शासन  या नियमानुसार आमची वाटचाल आहे'', असे ते म्हणाले.

आपण आपले 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि तंत्रज्ञानातील विश्वासू भागीदार म्हणून उदयाला  येण्याच्या दृष्टीने, पुनर्कल्पित महत्वाकांक्षेसह “पंतप्रधान  नरेंद्र मोदी तरुण भारतासाठी नवा  भारत घडवत आहेत.   काही विरोधी पक्षांनी लोकप्रियतेसाठी राबवलेल्या  रेवडी अर्थशास्त्रावर किंवा मोफत देण्याच्या  संस्कृतीवर त्यांचा विश्वास नाही,” यावर त्यांनी जोर दिला.

चंद्रशेखर यांनी स्टार्टअप्स  सुरू करतअसलेल्या अनेक तरुणांची  आणि उद्योजकांची  देखील भेट घेतली.  आणि त्यांच्याशी त्यांची अॅप्स/नवोन्मेष आणि ते  विक्रीयोग्य उत्पादनांमध्ये कशाप्रकारे विकसित करता येईल,  यावर चर्चा केली.

त्यानंतर ते सीआयआयद्वारे  आयोजित उद्योजक आणि इतर जिल्हा अधिकार्‍यांच्या बैठकीत सहभागी झाले.उद्योग , शिक्षण क्षेत्र आणि सरकार एकत्रितपणे इनक्युबेटेड स्टार्टअप्सना त्यांच्या नवोन्मेषांचे  व्यावसायिकीकरण करण्यासाठी कसे पाठबळ  देऊ शकतात यासंदर्भात विचार करण्याचे आवाहन मंत्र्यांनी यावेळी केले.स्थानिक आकांक्षांचे मॅपिंग करून जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रम तयार करण्यात योगदान देण्याच्या सूचना  त्यांनी उद्योजकांना तसेच जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या.

कालपासून राजकोट आणि सुरेंद्रनगरच्या दोन दिवसांच्या  अधिकृत दौऱ्यावर असलेल्या मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी  विद्यार्थी, व्यावसायिक , स्टार्टअप्स, उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी  आणि इतर मान्यवरांची भेट घेतली.आणि सर्व भारतीयांना सक्षम बनवण्याचा ' सबका साथ सबका विकास.'हा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  दृष्टीकोन  सामायिक केला.

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1865187) Visitor Counter : 58


Read this release in: English , Urdu , Hindi