संरक्षण मंत्रालय
नौदलाच्या अर्ध मॅरेथॉनचे मुंबईत पुन्हा सळसळणार चैतन्य
Posted On:
29 SEP 2022 4:09PM by PIB Mumbai
मुंबई, 29 सप्टेंबर 2022
नौदलाचा पश्चिम विभाग (कमांड), नोव्हेंबरच्या तिसर्या रविवारी, नौदल दिनानिमित्ताने (04 डिसें) वार्षिक समारोहअंतर्गत, अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करतो. यावर्षी ही मॅरेथॉन 20 नोव्हेंबर 22 रोजी नियोजित आहे. धावपटूंमध्ये लोकप्रियता वाढत असलेल्या या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा 13 ऑगस्ट 22 रोजी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न नेव्हल कमांड यांनी केली. सर्व गटांसाठी wncnavyhalfmarathon.com या संकेतस्थळावर 15 ऑगस्ट 22 पासून यासाठी नोंदणी सुरू आहे.
गेल्या दोन स्पर्धांवेळी 15,000 धावपटूंची मर्यादा घालत नोंदणी बंद करावी लागली होती. सशस्त्र दलातील धावपटूंव्यतिरिक्त, कॉर्पोरेट संस्था, सरकारी क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय मंचांवरील धावपटूंनी मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत भाग घेतला आहे. बीकेसी आणि बॅलार्ड इस्टेटमध्ये याआधी मॅरेथॉन आयोजित केली होती. यंदा दक्षिण मुंबईतील प्रतिष्ठित आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांहून मॅरेथॉनचा मार्ग जाणार आहे. धावपटूंकडून उत्साह आणि उत्सुकतेने याचे स्वागत केले जात आहे.
मॅरेथॉन हा शारीरिक तंदुरुस्तीशी निगडीत असून हा उपक्रम भारतीय नौदल आणि देशाच्या समृद्ध सागरी वारशाबद्दल जागरूकता निर्माण करतो. याव्यतिरिक्त, या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये “स्वच्छ किनारे आणि स्वच्छ समुद्र निरामय आरोग्यास फलदायी” असा संदेश देण्यात आला आहे. ही सर्वाथाने वेगळी स्पर्धा आहे. समुद्र, किनारे आणि देश स्वच्छ, हरित, प्रदूषण आणि कचरामुक्त तसेच पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी कचरामुक्त आणि ‘हरित’ उपक्रमाचे उद्दिष्ट यासाठी ठेवले आहे. सर्व सहभागींकडून याकरिता सहकार्याची अपेक्षा आहे. 21 किमी एअरक्राफ्ट कॅरियर रन, 10 किमी डिस्ट्रॉयर रन आणि 5 किमी फ्रिगेट रन या तीनपैकी कोणत्याही प्रकारात इच्छुक धावपटू नोंदणी करू शकतात.
सर्व नागरीकांसाठी (पुरुष, स्त्रिया आणि मुले) ही मॅरेथॉन खुली आहे. मात्र वयानुसार गटांसाठी निकष ठरवले आहे; 12 वर्षांसाठी 5 किमी, 16 वर्षांसाठी 10 किमी आणि 18 वर्षांसाठी 21.1 किमी.
तीन वर्षांच्या महामारीनंतर मुंबईतील ही पहिली मोठी शर्यत असल्याने, धावपटू आणि प्रेक्षकांमधे मोठा उत्साह आहे. वेगाने जागा भरत असून नोंदणी बंद करण्याबाबत योग्य तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे आयोजकांनी सूचित केले आहे.
S.Kane /V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1863383)
Visitor Counter : 157