उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘पंडित दीनदयाल उपाध्याय- जीवन दर्शन और समसामायिकता” ह्या पुस्तकाचे प्रकाशन
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2022 9:25PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत "पं. दीनदयाल उपाध्याय - जीवन दर्शन और समसामायिकता" (पाच खंड) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी आजच्या काळात पं दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
"शिक्षित माणूस समाजाची अधिक उत्तम सेवा करु शकतो, या अर्थाने शिक्षण ही सामाजिक गुंतवणूकच आहे," हे पं दीनदयाल यांचे विचार उद्धृत करत याच विचारातून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 चा मसुदा तयार करण्यात आला आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. "जर भारताला पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवायचे असेल, तर आपल्याला जीडीपी आणि अर्थशास्त्राच्या पलीकडे जावे लागेल आणि पं दीनदयाल उपाध्यायजी यांच्या विचारांनुसार मानवी विकासाचा सर्वांगीण दृष्टिकोन अंगीकारावा लागेल,” असे धनखड यांनी सांगितले.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी केंद्रीय मंत्री डॉ मुरली मनोहर जोशी, पुस्तकाचे मुख्य संपादक डॉ बजरंग लाल गुप्ता, प्रकाशक (किताबवाले) प्रशांत जैन, सहसंपादक, डॉ अमित राय जैन, महाराजा अग्रसेन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संस्थापक-संचालक डॉ नंद किशोर गर्ग आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.








***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1862001)
आगंतुक पटल : 231