दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बीएसएनएल गोवा यांच्याकडून लँडलाईन/ब्रॉडबँड जोडणीच्या एफटीटीएच रूपांतरणासाठी मर्यादित कालावधीची सवलत जाहीर

Posted On: 21 SEP 2022 4:13PM by PIB Mumbai

पणजी, 21 सप्टेंबर 2022

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), गोवा यांच्याकडून लँडलाईन ब्रॉडबँड जोडणीच्या एफटीटीमध्ये (Fiber to the Home - on Fiber Media) रुपांतरणासाठी मर्यादीत कालावधीची सवलत जाहीर करण्यात आली आहे. एफटीटीएचमध्ये रुपांतरीत करणाऱ्या ग्राहकांना 6 महिन्यांपर्यंत दरमहा 200 रुपयांची सूट दिली जाणार आहे. एफटीटीएच जोडणी रुपांतरणानंतरही विद्यमान लँडलाइन क्रमांक कायम राहतील. ज्या ग्राहकांनी आपले लँडलाईन क्रमांक कायमचे बंद केले आहेत त्यांच्यासाठीही ही योजना खुली आहे. बंद जोडण्या पुन्हा सक्रिय करुन फायबर कनेक्शनमध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात, तसेच पूर्वीचा क्रमांक कायम ठेवता येईल.

फायबर रूपांतरित जोडणी उच्च विश्वासार्हता, जलद सेवा, आणि कमी देखभालीची अशी आहे. अमर्याद व्हॉईस कॉल आणि 300 Mbps पर्यंत हाय स्पीड डेटा अशा सुविधा असणाऱ्या विविध योजना उपलब्ध आहेत. निवडक ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकत्रित सदस्यता प्रदान करणाऱ्या योजना देखील यात आहेत. बीएसएनल गोवा कार्यालयाला ग्राहकांकडून या योजनेसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.  800 लँडलाईन ग्राहकांनी यापूर्वीच फायबर जोडणी घेतली आहे.

एफटीटीएचसाठी नोडल अधिकाऱ्यांची यादी:

 

(Source: BSNL)

S.Thakur/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861158) Visitor Counter : 168


Read this release in: English