आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 216.95 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वर्षे वयोगटातील, 04 कोटी 08 लाखांहून जास्त जणांना पहिली लसमात्रा

देशात उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजार 216

देशभरात गेल्या 24 तासात, 4 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (कोरोनाची लागण होण्याचा दर) सध्या 1.80%

Posted On: 21 SEP 2022 12:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2022

आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार, भारतात कोविड-19 च्या लसमात्रांची संख्या 216 कोटी 95 लाखांवर (2 अब्ज 16 कोटी 95 लाख 51 हजार 591) पोहोचली आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटासाठी कोविड 19 लसीकरण, 16 मार्च 2022 रोजी सुरू झालं.  आतापर्यंत 4 कोटी 8 लाखाहून जास्त (04 कोटी 08 लाख, 52 हजार, 001)मुलांना कोविड-19 लसीची पहिली मात्र मिळाली आहे.  त्याच प्रमाणे 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी कोविड -19 लसीची खबरदारीची मात्रा 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.

आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकंदर आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,909

2nd Dose

1,01,14,592

Precaution Dose

69,53,881

FLWs

1st Dose

1,84,36,250

2nd Dose

1,77,11,873

Precaution Dose

1,35,26,783

Age Group 12-14 years

1st Dose

4,08,52,001

2nd Dose

3,13,24,504

Age Group 15-18 years

1st Dose

6,18,86,738

2nd Dose

5,28,80,405

Age Group 18-44 years

1st Dose

56,11,15,098

2nd Dose

51,51,57,992

Precaution Dose

8,67,04,230

Age Group 45-59 years

1st Dose

20,40,01,904

2nd Dose

19,68,22,012

Precaution Dose

4,52,44,492

Over 60 years

1st Dose

12,76,49,068

2nd Dose

12,30,47,449

Precaution Dose

4,57,07,410

Precaution Dose

19,81,36,796

Total

2,16,95,51,591

भारतातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजार 216 एवढी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देशातल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या 0.10% आहे.

भारतात कोरोनातून  बरे होण्याचा दर 98.71% आहे. देशात गेल्या 24 तासात, 05 हजार 640 कोरोना रुग्ण  बरे झाले आणि देशातल्या बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सुरुवातीपासून आतापर्यंतची एकूण संख्या 04 कोटी, 39 लाख, 72 हजार, 980 आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 04 हजार 510 रुग्णांची नोंद झाली.

देशात गेल्या 24 तासात कोविड 19 च्या एकूण 03 लाख 39 हजार 994 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 23 लाखाच्या वर (89 कोटी 23 लाख 89 हजार 008) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी (कोरोनाची लागण होण्याचा) दर सध्या 1.80%, तर दैनिक पॉझिटिव्हीटी (कोरोनाची लागण होण्याचा) दर 1.33%.आहे.

S.Patil /A.Save/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1861069) Visitor Counter : 274