महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील महिला सक्षमीकरण आणि त्यासाठी सीएसआरचा प्रेरकशक्तीच्या रुपात वापर या विषयावर राष्ट्रीय महिला आयोगाची मुंबईत गोलमेज सल्लागार बैठक


महिलांच्या समग्र विकासासाठी सीएसआरचा वापर करण्याच्या दृष्टीने अभ्यास आणि नियोजन करणे हा या बैठकीच्या आयोजनाचा मुख्य उद्देश

Posted On: 15 SEP 2022 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022

राष्ट्रीय महिला आयोगाने सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने  मोठ्या औद्योगिक संस्था तसेच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रमुख यांच्यासह आज मुंबईत ‘भारतातील महिलांचे सक्षमीकरण आणि त्यासाठी सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा प्रेरकशक्तीच्या रुपात वापर’ या विषयावरील गोलमेज सल्लागार बैठक आयोजित केली होती. देशातील महिलांच्या समग्र विकासासाठी सीएसआरचा वापर करण्याच्या दृष्टीने अभ्यास आणि नियोजन करणे हा या सल्लागार बैठकीच्या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. इतर अनेक मुद्द्यांबरोबर शाश्वत विकास ध्येये तसेच महिला सक्षमीकरण आणि ‘सीएसआर: क्रिएटिंग कोलबोरेटिव्ह स्पेसेस’ या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, सीआयआयच्या सीएसआरविषयक राष्ट्रीय समितीचे सह-अध्यक्ष आशंक देसाई, आयोगाच्या सदस्य मीता राजीवलोचन तसेच सीआयआयच्या सीएसआरविषयक राष्ट्रीय समितीच्या सह-अध्यक्ष रुमझुम यांनी संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये 32 विविध कॉर्पोरेट संस्थांच्या सीएसआर प्रमुखांनी भाग घेतला.

उद्योग क्षेत्र सहभागी होऊ शकेल आणि सहकारी संबंध प्रस्थापित करू शकेल अशा महिला सशक्तीकरणाच्या विविध पैलूंना रेखा शर्मा यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात स्पर्श केला. यामध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांतून बचावलेल्या स्त्रियांचे पुनर्वसन, मानवी तस्करीच्या गुन्ह्यांतून सोडवून आणलेल्या पिडीतांसाठी रोजगार निर्मिती, दिव्यांग महिलांचे कौशल्य प्रशिक्षण, मुलींचे शिक्षण, संशोधन आणि माहितीचा कोष निर्माण करणे अशा अनेक घटकांचा समावेश होता.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आता लैंगिक विषमतेचया समस्येवरील उपाययोजनांचा नवा मार्ग ठरला हे .कॉर्पोरेट उद्योगांनी समान प्राधान्याच्या बाबी निश्चित केल्या आणि ठळकपणे दिसून येईल असा मोठा बदल घडवून आणण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याने त्याबाबत काम सुरु केले तर सर्वच क्षेत्रांमध्ये महिला सशक्तीकरणात वाढ करता येऊ शकेल, असे शर्मा म्हणाल्या.

एका स्वतंत्र चर्चासत्रात, या बैठकीतील सहभागींनी, तस्करीला बळी पडलेल्या महिलांसाठी कौशल्य शिक्षण आणि निवारा पुरविणे, काम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक समावेशन तसेच लहान मुलांच्या देखभालीसाठी पाठबळ अशा विषयांमध्ये या महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या कार्यात उभी राहणारी आव्हाने आणि या आव्हानांचा सामना करण्यासाठी उद्योगक्षेत्र कशा प्रकारे एकत्र येऊ शकते यावर उहापोह केला.महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यात सरकारची भूमिका आणि महिला सशक्तीकरण करण्यात सीएसआर अधिक सुलभता कशी आणु शकेल याबद्दल उपस्थितांचे दृष्टीकोन यावेळी जाणून घेण्यात आले.

या गोलमेज बैठकीमुळे, महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत  कॉर्पोरेट संस्थांकडून हाती सीएसआर उपक्रमांबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला अधिक माहिती मिळवण्यास मदत झाली. भविष्यात महिला सशक्तीकरणाच्या दिशेने सहयोगी उपक्रम हाती घेण्याच्या दिशेने मार्ग आखता यावा हा या परिषदेचा उद्देश होता.

 

R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1859694) Visitor Counter : 559


Read this release in: English , Urdu , Hindi