युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

फेडरेशन इंटरनॅशनल डी फूटबॉल असोसिएशनची (फिफा ) 17 वर्षांखालील महिला विश्वचषक 2022 स्पर्धा भारतात आयोजित करण्याच्या हमीपत्रावर स्वाक्षरी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 14 SEP 2022 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनची (फिफा-आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ ) 17 वर्षांखालील महिला विश्वचषक 2022 स्पर्धा भारतात आयोजित करण्यासाठीच्या  हमीपत्रांवर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.

फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वचषक 2022 स्पर्धा  भारतात 11 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे. ही सातवी द्विवार्षिक युवा स्पर्धा असून भारतात आयोजित करण्यात येणारी फिफाची   महिलांसाठीची ही  पहिलीच स्पर्धा असेल.फिफा 17 वर्षांखालील  पुरुष विश्वचषक 2017 स्पर्धेचा आत्मविश्वासपूर्ण वारसा पुढे नेत,भारत देश महिला फुटबॉलसाठी अत्यंत महत्त्वाच्या क्षणाची तयारी करत आहे. या स्पर्धेत जगभरातील सर्वोत्कृष्ट तरुण महिला फुटबॉलपटू प्रतिष्ठित चषक उचलण्यासाठी त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज आहेत.

आर्थिक परिव्यय :

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला  (एआयएफएफ)  मैदानाची देखभाल, स्टेडियममधील वीज, ऊर्जा आणि केबलिंग, स्टेडियम आणि प्रशिक्षणस्थळ, ब्रँडिंग इत्यादीसाठी 10 कोटी रुपयांच्या आर्थिक साहाय्याची पूर्तता, राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ ) साहाय्य योजनेसाठी असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून केली जाईल.

योजनेची उद्दिष्टे:

  • फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वचषक 2022 स्पर्धेमध्ये देशातील महिला फुटबॉल क्षेत्र बळकट करण्याची क्षमता आहे.
  • फिफा 17 वर्षांखालील  पुरुष विश्वचषक 2017 स्पर्धेचा आत्मविश्वासपूर्ण  वारसा पुढे नेतभारत देश महिला फुटबॉलसाठी अत्यंत महत्त्वाच्या क्षणाची तयारी करत आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट तरुण महिला फुटबॉलपटू प्रतिष्ठित चषक उचलण्यासाठी त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज असताना सकारात्मक ठसा उमटवण्यासाठी खालील उद्दिष्टांचा  विचार करण्यात आला आहे:
  • फुटबॉलमध्ये नेतृत्व करणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे
  • भारतात अधिकाधिक मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित करणे
  • लहानपणापासून समान खेळाच्या संकल्पनेचे सामान्यीकरण करून लिंग-समावेशक सहभागाचा पुरस्कार करणे
  • भारतातील महिलांसाठी फुटबॉलचा दर्जा सुधारण्याची संधी
  • महिला फुटबॉलचे व्यावसायिक मूल्य सुधारणे

औचित्य:

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफा अंडर-17 महिला विश्वचषक ही एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे आणि ती भारतात प्रथमच आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा अधिकाधिक  तरुणांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि भारतातील फुटबॉल खेळाच्या विकासास मदत करेल. या स्पर्धेमुळे केवळ फुटबॉल हा भारतीय मुलींमध्ये आवडीचा खेळ म्हणून पुढे येणार नाही, तर देशातील मुली आणि महिलांना सर्वसाधारणपणे फुटबॉल आणि  इतर खेळ स्वीकारण्यासाठी एक कायमस्वरूपी वारसा त्यामुळे मिळेल.

पार्श्वभूमी:

फिफा अंडर-17 महिला विश्वचषक ही फिफाद्वारे आयोजित 17 वर्षांखालील किंवा 17 वर्ष  वयापर्यंतच्या महिला खेळाडूंसाठीची जागतिक स्पर्धा आहे. या स्पर्धा  2008 मध्ये सुरू झाल्या  आणि पारंपरिकपणे सम-संख्येच्या वर्षांत आयोजित केल्या जातात. 6 वी स्पर्धा उरुग्वे येथे 13 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. स्पेन हा फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धेचा सध्याचा विजेता आहे. सातवी फिफा अंडर-17 महिला विश्वचषक स्पर्धा यंदा भारतात होत आहे. त्यात भारतासह 16 संघ सहभागी होतील. ऑल इंडिया फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) (a) भुवनेश्वर; (b) नवी मुंबई आणि (c) गोवा या 3 ठिकाणी सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारताने 6 ते 28 ऑक्टोबर 2017 या कालावधीत फिफा अंडर-17 पुरुष विश्वचषक इंडिया-2017 स्पर्धेचे, नवी दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, गोवा, कोची आणि कोलकाता या 6 वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वी आयोजन केले होते .

S.Kulkarni /Sonal C./Prajna/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1859253) Visitor Counter : 160