इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय स्टार्टअप हब आणि मेटा’तर्फे एक्स्टेंडेड रिअॅलिटी टेक्नॉलॉजीज क्षेत्रात प्रगत स्टार्टअपच्या निर्मितीसाठी एक्सआर स्टार्टअप कार्यक्रमाची घोषणा


“टियर 2/टियर 3 शहरांमधील भारतीय स्टार्टअप्स, भारतासाठी आणि जगासाठी, प्रगत तंत्रज्ञान आणि आंतरजालाला आकार देतील” - राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

Posted On: 13 SEP 2022 7:55PM by PIB Mumbai

 

देशभरातील XR तंत्रज्ञान स्टार्टअप्सना साहाय्य देण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एमईआयटीवाय स्टार्टअप हब - (एमएसएच) आणि मेटातर्फे आज एक्सआर स्टार्टअप कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

यावेळी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की पुढच्या दहा वर्षांत युवा भारतीयांना तंत्रज्ञान क्षेत्रात असंख्य संधी उपलब्ध करून देण्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे.  2025 सालापर्यंत भारताला एक ट्रिलियन-डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीच्या वाढीला चालना देण्यासाठी मेटाच्या सहकार्याने, आवश्यक ते प्रोत्साहन लाभत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टियर 2/3 शहरांमधील भारतीय स्टार्टअप्सच्या क्षमतेवर तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या नरेंद्र मोदी सरकारच्या वचनबद्धतेवर भर देत ते म्हणाले की युवा भारतीय स्टार्टअप्स, विशेषत: टियर 2/3 शहरांमधील स्टार्टअप्स वेब 3.0, ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्ता, मेटाव्हर्स अशा नव्याने उदयाला येणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील तसेच भारतासाठी आणि जगासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि आंतरजालाला आकार देतील.

भविष्यातील तंत्रज्ञान परिभाषित करण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत, मेटा ग्लोबल पॉलिसीचे उपाध्यक्ष जोएल कॅप्लान यांनी व्यक्त केले. भारतात गुंतवणुकीच्या दृष्टीने घेतलेले निर्णय आणि गुंतवणूक, आता, तंत्रज्ञान कशा प्रकारे जास्त आर्थिक संधी आणि लोकांसाठी उपयुक्त परिणाम प्रदान करू शकेल, याबाबतच्या जागतिक चर्चेला दिशा देत असल्याचेही ते म्हणाले.

या कार्यक्रमांतर्गत एक्सआर  तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या प्रारंभिक टप्प्यातील 40 स्टार्टअप्सना प्रत्येकी 20 लाख रुपयांचे अनुदान प्रदान केले जाणार आहे. त्याचबरोबर ग्रँड चॅलेंजच्या माध्यमातून शिक्षण, अध्ययन आणि कौशल्ये, आरोग्यसेवा, गेमिंग आणि मनोरंजन, कृषी तंत्रज्ञान  आणि हवामान बदलासंदर्भातील कृती, पर्यटन आणि शाश्वतता अशा क्षेत्रांमधील प्रारंभिक टप्प्यातील नवोन्मेषकांना  प्रोत्साहन दिले जाईल.

अँक्सलरेटर आणि ग्रँड चॅलेंजच्या माध्यमातून स्टार्ट-अप्स तसेच नवोदितांना ग्राहक विस्तार, भागीदारीच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच निधी उभारणीसह इतर बाबींसाठी सुद्धा साहाय्य  मिळणार आहे.

या एक्सआर  स्टार्टअप कार्यक्रमाला मेटाच्या 'एक्सआरप्रोग्रॅम्स अँड रिसर्च फंड'चे    सहाय्य  लाभले आहे. त्याअंतर्गत दोन वर्षांच्या अवधीत 50 दशलक्ष डॉलरच्या गुंतवणुकीसह उद्योग क्षेत्रातील भागीदार, नागरी हक्क गट, सरकारे, विना-नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्था तसेच शैक्षणिक संस्थांच्या सोबतीने कार्यक्रम राबवले जाणार असून संशोधनही केले जाणार आहे.

***

S.Kakade/M.Pange/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1859040) Visitor Counter : 190


Read this release in: English , Urdu , Hindi