सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

जुलै 2022 च्या महिन्यासाठी औद्योगिक उत्पादन आणि वापरावर आधारित निर्देशांकाचा तात्पुरता अंदाज (आधार  2011-12=100)

Posted On: 12 SEP 2022 7:30PM by PIB Mumbai

 

जुलै 2022 या महिन्यासाठी, 2011-12 च्या आधारासह औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा तात्पुरता अंदाज  134.6  आहे.जुलै 2022 मधील खाण, उत्पादन आणि वीज या क्षेत्रांतील औद्योगिक उत्पादनांचे निर्देशांक अनुक्रमे 101.1, 135.2 आणि 188.9 इतके आहेत. आयआयपीचे पुनरावलोकन करताना या तात्पुरत्या अंदाजांचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल. .   

उपयुक्ततेवर -आधारित वर्गीकरणानुसार, जुलै 2022 मध्ये प्राथमिक वस्तूंसाठी निर्देशांक 131.7, भांडवली वस्तूंसाठी 97.8, मध्यवर्ती वस्तूंसाठी 148.9 आणि पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तूंसाठी 150.1 इतके आहेत. त्याचप्रमाणे जुलै 2022 साठी ग्राहकोपयोगी आणि बिगर - ग्राहक उपयोगी  वस्तूंसाठी   निर्देशांक  अनुक्रमे 121.5 आणि 143.0 इतके आहेत.

राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरणाच्या (NIC-2008) 2-अंकी स्तरावरील विभागीय आणि उपयुक्ततेवर-आधारित वर्गीकरणानुसार जुलै 2022 महिन्याच्या औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकाच्या तात्पुरत्या अंदाजांचे तपशील अनुक्रमे परिशिष्ट  I, II आणि III मध्ये दिले आहेत.तसेच ग्राहकांनी औद्योगिक क्षेत्रातील बदलांची नोंद घ्यावी यासाठी, परिशिष्ट  IV हे उद्योग समूह (NIC-2008 च्या 2-अंकी स्तरानुसार) आणि विभागानुसार, मागील 12 महिन्यांचे निर्देशांक प्रत्येक महिन्याला जाहीर करत असते.

5. जुलै 2022 महिन्यासाठी IIP च्या तात्पुरत्या अंदाजासह जून 2022 च्या निर्देशांकांची पहिली आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे आणि एप्रिल 2022 च्या निर्देशांकांची अंतिम आवृत्ती स्रोत एजन्सींकडून प्राप्त झालेल्या अद्ययावत माहितीनुसार जाहीर झाली आहे.जुलै 2022 साठी तात्पुरता  अंदाज, जून 2022 साठी पहिली दुरुस्ती  आणि एप्रिल 2022 साठी  अंतिम दुरुस्ती प्रसिद्ध करण्यात आली असून  अनुक्रमे 89 टक्के, 93 टक्के आणि 95 टक्के इतकी असून हे अंदाज भारित प्रतिसाद दरांवरून संकलित केलेले आहेत.

***

S.Kane/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858777) Visitor Counter : 191


Read this release in: Manipuri , English , Urdu , Hindi