संरक्षण मंत्रालय
पश्चिमी नौदल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल एबी सिंह यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
Posted On:
09 SEP 2022 8:30PM by PIB Mumbai
पश्चिमी नौदल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांनी पत्नी चारू सिंह (NWWA (WR) च्या प्रमुख ) यांच्यासमवेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची गुरुवारी (8 सप्टेंबर , 2022) राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.
ध्वजाधिकारी कमांडिंग-इन-चीफ यांनी राष्ट्रपतींना एकूण, विशेषत: पश्चिम हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षा वृद्धिंगत करण्यासाठी भारतीय नौदल करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. इंडिया@100 पर्यंत पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारतीय नौदलाच्या उपक्रमांचीही त्यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली.
व्हाईस अॅडमिरल एबी सिंह हे राष्ट्रपतींचे मानद सहाय्यक आहेत.


***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1858153)
Visitor Counter : 142