वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताची एप्रिल-ऑगस्ट 2022-23 काळातील व्यापारी माल निर्यात, एप्रिल-ऑगस्ट 2021-22 मधील 164.44 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 17.1% वाढीसह 192.59 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली

Posted On: 03 SEP 2022 7:57PM by PIB Mumbai

 

भारताची ऑगस्ट 2022 मधील व्यापारी माल-निर्यात 33.0 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी राहिली, जी ऑगस्ट 2021 मधील 33.38 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या जवळपास समान पातळीवर होती. 

ऑगस्ट 2022 मध्ये बिगर-पेट्रोलियम निर्यातीचे मूल्य 28.09 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते, त्याने ऑगस्ट 2021 मधील 28.73 अब्ज अमेरिकी डॉलर्स बिगर-पेट्रोलियम निर्यातीच्या तुलनेत केवळ 2.22% इतकी नकारात्मक वृद्धी नोंदवली. एप्रिल-ऑगस्ट 2022-23 मधील बिगर-पेट्रोलियम निर्यातीचे मूल्य 152.29 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते, ज्याने एप्रिल-ऑगस्ट 2021-22 मधील 141.05 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत 7.97% वृद्धी नोंदवली.          

ऑगस्ट 2022 मधील बिगर-पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीचे मूल्य 24.8 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते, ज्याने ऑगस्ट 2021 मधील 25.29 अब्ज अमेरिकी डॉलरच्या बिगर-पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीच्या तुलनेत 1.96% नकारात्मक वृद्धी नोंदवली. एप्रिल-ऑगस्ट 2022-23 मध्ये बिगर-पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीचे एकत्रित मूल्य 135.49 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते, जे एप्रिल-ऑगस्ट मधील बिगर-पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीच्या तुलनेत 8.4% ने वाढले आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू (50.68%), तांदूळ (42.32%), सेंद्रिय आणि बिगर-सेंद्रिय  रसायने (13.35%) या प्रमुख उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

ऑगस्ट 2022 मध्ये भारताची व्यापारी मालाची आयात 61.68 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, तिने ऑगस्ट 2021 मधील 45.09 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत 36.78% वाढ नोंदवली. एप्रिल-ऑगस्ट 2022-23 मध्ये भारताची व्यापारी आयात 317.81 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, तिने एप्रिल-ऑगस्ट 2021-22 मधील 218.22 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत 45.64% वाढ नोंदवली.

आयातीमधील वृद्धी, भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आणि वेगाने होत असलेला विकास, यामुळे वाढत असलेली देशांतर्गत अर्थव्यवस्थेची मागणी दर्शवते.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856557) Visitor Counter : 237


Read this release in: English , Urdu