गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथील दिल्ली पोलीस मुख्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर घेतली विस्तृत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाला अंमली पदार्थांच्या शापातून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध
महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आणि त्यांना अधिक व्यावसायिक आणि संवेदनशील दृष्टिकोनासह सुरक्षित वातावरण प्रदान करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याचे निर्देश
Posted On:
30 AUG 2022 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे दिल्ली पोलीस मुख्यालयाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर विस्तृत बैठक घेतली.दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि न्यायवैद्यक विज्ञान तपासणीसह फौजदारी न्याय प्रणाली एकात्मिक करण्यासाठी दिल्लीतील 6 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक तपासणी अनिवार्य करावी असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीत दिले. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये कायदेशीर तपासणीनंतरच पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले पाहिजे असे शहा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाला अंमली पदार्थांच्या शापातून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध असून दिल्लीत अंमली पदार्थांवर कारवाई करण्यासाठी विस्तृत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.
महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे असे सांगून त्यांना अधिक व्यावसायिक आणि संवेदनशील दृष्टिकोनासह सुरक्षित वातावरण प्रदान करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात यावी असे निर्देशही केंद्रीय गृहमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1855594)
Visitor Counter : 148