दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी “इंडिया @75 : धोलावीरा ते नरेंद्र मोदी” या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केले
Posted On:
26 AUG 2022 10:26PM by PIB Mumbai
भारताला एक समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी तसेच या देशातील प्रत्येक नागरिकाला या समृद्धीचा लाभ मिळावा यादृष्टीने युवावर्गाने लक्षणीय योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. युवकांनी भविष्यातील प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी उत्तुंग उद्दिष्टे निश्चित करून ती साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. नवी दिल्लीत सिरी फोर्ट इथे आयोजित केलेल्या इंडिया @75 : धोलावीरा ते नरेंद्र मोदी या सांस्कृतिक कार्यक्रमात गोयल बोलत होते.
एक विकसित राष्ट्र होण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारताच्या प्रगतीसाठी आगामी 25 वर्षांचा अमृत काळ अतिशय महत्वाचा आहे, एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताच्या 75 वर्षांच्या कालखंडाने एक पाया तयार करण्यास मदत केली आहे, ज्याची फळे आपल्यापैकी प्रत्येकाला येत्या काही वर्षांत चाखायला मिळतील, आज आपण या टप्प्यापर्यंत कसे पोहोचलो आणि भविष्यात आपण स्वतःला कुठे बघत आहोत, यावर विचार करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या " इंडिया @75 : धोलावीरा ते नरेंद्र मोदी " या संकल्पनेमुळे भारताच्या हजारो वर्षांच्या वारशाचे स्मरण होते, भारत ही लोकशाहीची जननी असून हजारो वर्षांपासून भारतात लोकशाहीची पाळेमुळे रुजली आहेत, आपल्याला लाभलेल्या समृद्ध वारशाचे आपण जतन केले आहे, आणि येणाऱ्या 25 वर्षांच्या काळात भारत स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतक महोत्सव साजरा करत असताना आपल्याला हा वारसा लाभदायी ठरेल असे ते म्हणाले.
विद्यार्थी हे नवीन भारताचे भविष्य आहेत असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःवर, स्वतःच्या देशावर , सर्व उत्तम गोष्टींवर विश्वास ठेवण्याचा आणि वाईट गोष्टी बदलण्याचा सल्ला दिला. आपण सर्वजण मिळून भारताच्या भविष्यात परिवर्तन आणू शकतो , आपण भारताचे भविष्य एकत्रितपणे लिहूया , असेही ते म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरणाचे कौतुक करून गोयल यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक वृत्ती विकसित करून नवनिर्मिती करणारे आणि उद्योजक बनण्याचे आवाहन केले.
***
R.Aghor/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1854772)
अभ्यागत कक्ष : 180