वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनी "सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) ऑर्डर, 2017" या विषयावरील परिषदेचे केले उद्घाटन
Posted On:
23 AUG 2022 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथील वाणिज्य भवन येथे “सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) ऑर्डर, 2017” या विषयावरील परिषदेचे उद्घाटन केले. ऑर्डरीविषयी भागधारकांना जागरूक करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला सामूहिक संकल्प करण्याची गरज आहे, सामूहिक संकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सांगितलेल्या 5 प्राणांपैकी एक आहे, असे गोयल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. समाजातील सगळ्यात शेवटच्या व्यक्तीपर्यंत समृद्धी पोहोचेल याची खात्री करण्यासाठी आपल्याला सामूहिक संकल्पाबरोबरच कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे, असे ते पुढे म्हणाले.
सरकारच्या एका ठिकाणी असलेल्या इ मार्केटमध्ये (जीईएम) ठेवलेल्या उत्पादनांच्या स्वदेशीकरणाच्या बाबतीत चुकीच्या घोषणेसंदर्भात खरी माहिती देणाऱ्याची (व्हिसलब्लोअर) भूमिका बजावण्याचे गोयल यांनी आवाहन केले. यामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास मदत होईल, त्यामुळे देशांतर्गत वस्तू आणि सेवांना प्रोत्साहन मिळेल, असेही ते म्हणाले. आपण हा उपक्रम सर्वांसमोर करत आहोत कारण पंतप्रधानांना अभिप्रेत असलेल्या कामकाजातल्या पारदर्शकतेसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, असे गोयल यांनी सांगितले.
सार्वजनिक खरेदीमध्ये आमचा टीआरपी आहे: विश्वास, विश्वासार्हता आणि समृद्धी. सरकारच्या इ मार्केट (GeM) खरेदी प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास आपण उत्सुक आहोत आणि तो वापर अधिक प्रभावी करण्यासाठी उद्योगाने सहकार्य करावे असे गोयल यांनी स्पष्ट केले.
उद्योगांनी सरकारशी समन्वय ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्योगांना काही शोषणविषयक समस्या येत असल्यास त्यांनी त्या सांगाव्यात त्या समस्या खुलेपणाने सोडविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक उद्योगांच्या क्षमतेवर गोयल यांनी विश्वास व्यक्त केला. या विकासाच्या प्रवासात त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. उद्योगांकडून सूचना मागवताना ते म्हणाले की, सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास हे आमचे ध्येय खऱ्या अर्थाने उद्योगांच्या सक्रिय सहभागामुळे साकार होण्यास मदत करेल.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853898)
Visitor Counter : 155