पंचायती राज मंत्रालय
आत्मनिर्भर आणि विकसित गावे हाच आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा पाया असल्याचे कपिल मोरेश्वर पाटील यांचे प्रतिपादन
Posted On:
22 AUG 2022 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2022
'स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेले गाव' या संकल्पनेवर आधारित पंचायतींमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण (LSDGs) या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन आज केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि पंजाबचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांच्या हस्ते पंजाबमधील मोहाली येथे झाले. दोन दिवसीय कार्यशाळेत देशभरातून पंचायती राज संस्थांचे सुमारे 1,300 निवडून आलेले प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
आपल्या भाषणात कपिल मोरेश्वर पाटील म्हणाले की, गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. ही परिषद विचारांची देवाणघेवाण आणि स्थानिक प्रशासन आणि पंचायती राज संस्थांमधील विनिमय कार्यक्रमांद्वारे राज्यांद्वारे अनुसरण करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींची संधी प्रदान करते. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ते उपयुक्त ठरेल.
कपिल मोरेश्वर पाटील म्हणाले की, केंद्र सरकार राज्यांना पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेशी आर्थिक मदत करते. आत्मनिर्भर गावांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून राज्यांना पूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. अक्षय ऊर्जा प्रदूषणमुक्त ऊर्जा प्रदान करते याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की बहुतांश पंचायती डिजिटल झाल्या आहेत. इच्छित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वांचा समावेश असलेल्या सर्वांगीण दृष्टीकोनातून काम करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1853711)
Visitor Counter : 165