जलशक्ती मंत्रालय

महाराष्ट्रातल्या शिर्डी,  येथे सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीविषयक 5- दिवसीय कार्यशाळेत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने आयोजित केली 30 शेतकऱ्यांची  भेट


अर्थ गंगा अभियाना अंतर्गत शेतकर्‍यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे एनएमसीजीच्या महासंचालकांनी  केले आवाहन

Posted On: 19 AUG 2022 9:30PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (एनएमसीजी) ने 18 ते 22 ऑगस्ट 2022 या काळात महाराष्ट्रातल्या शिर्डीयेथे आयोजित केलेल्या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती (SPNF) प्रशिक्षण आणि कार्यशाळेत गंगा नदीच्या खोऱ्यातील जवळजवळ 30 शेतकऱ्यांची एक्सपोजर विझिट, अर्थात निरीक्षण आणि प्रशिक्षण भेट आयोजित केली आहे. शेतीमधील दूषित पाण्याच्या प्रवाहाला गंगा नदी पात्रात वाहून जायला अटकाव घालून, डिसेंबर 2019 मध्ये कानपूर येथे झालेल्या 1 ल्या राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांनी समर्थन केलेल्या अर्थ गंगा उपक्रमा अंतर्गत नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत उपजीविका मॉडेल निर्माण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, नमामि गंगे कार्यक्रमा अंतर्गत नैसर्गिक शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांची ही कार्यशाळा भेट आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमा अंतर्गत गंगा नदीच्या दोन्ही बाजूला 10 किलोमीटरच्या पट्ट्यात नैसर्गिक शेतीला चालना दिली जात आहे.

एनएमसीजीचे महाव्यवस्थापक अशोक कुमार 18 ऑगस्ट 2022  रोजी या कार्यशाळेत सहभागी झाले. ख्यातनाम कृषी तज्ञ, पद्मश्री सुभाष पाळेकर, जे कृषी समुदायामध्ये कृषी का ऋषीम्हणून  सुपरिचित आहेत, यावेळी उपस्थित होते. सुभाष पाळेकर शेती म्हणून सध्या भारतभर प्रचार होत असलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे ते प्रवर्तक आहेत.

अर्थ गंगा उपक्रमाच्या महत्वाच्या उद्दिष्टांपैकी एक म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे असून यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूला 10 किमी परिसरात रसायन-विरहित शेती द्वारे प्रत्येक थेंबामधून अधिक उत्पन्नमिळवणे याचा समावेश आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल सह गंगा नदीच्या मुख्य प्रवाहाच्या काठावरील राज्यांमधील सुमारे 30 शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला. अग्रगण्य शेतकरी आणि पालेकर यांचे अनुयायी माधवराव देशमुख देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुभाष पाळेकर आणि सहभागी शेतकऱ्यांमध्ये फलदायी संवाद झाला. आपल्या व्यापक अनुभवातून दाखले देत पालेकर यांनी नैसर्गिक शेतीची तंत्र आणि महत्व तसेच त्याचे आरोग्याला होणारे दीर्घकालीन फायदे याची माहिती दिली. 

दुसरीकडे, जिज्ञासू शेतकऱ्यांनी उपस्थितांना आपले अनुभव सांगितले आणि विविध प्रश्न विचारले. 

या कार्यशाळेत ड्रॅगन फ्रूट यांसारख्या विदेशी फळांची शेती, मिश्र शेती, केळी आणि मसाल्याच्या शेतीला  भेट आणि प्रशिक्षण, नैसर्गिक शेती मॉडेल द्वारे पडीक जमिनीचे शेत जमिनीत रुपांतर करण्याचे प्रशिक्षण, मध्यस्थ विरहित मूल्य साखळी तयार करण्यासाठी नैसर्गिक उत्पादनाच्या विपणानाबाबतचे  अनुभव इतरांना सांगणे इत्यादींचा या कार्यशाळेत समावेश आहे.

या कार्यक्रमाला संबोधित करताना जी. अशोक कुमार गेली 3-4 वर्ष मा गंगाबरोबरच्या आपल्या सहयोगाबाबत बोलले आणि गंगा नदीला निर्मल आणि अविरल बनवण्यासाठी 2014 मध्ये माननीय पंतप्रधानांनी नमामि गंगे कार्यक्रमाची संकल्पना कशी मांडली याची माहिती दिली.     

गंगा नदीचे किनारे रासायनिक शेती मुक्तकरण्यासाठीच्या योजनेबद्दल बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवून शेतीमधील दूषित पाणी गंगा नदी पात्रात वाहून जाण्यापासून रोखणे आणि अर्थ गंगा अभियाना अंतर्गत नैसर्गिक शेतीचे फायदे मिळवून देणे हे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एनएमसीजी सातत्त्याने प्रयत्न करत आहे.  

महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतकरी माधव राव देशमुख यांनी, पाळेकर यांच्या नैसर्गिक शेतीच्या तंत्राचा देशभर प्रचार करून त्याचे जन आंदोलनात रुपांतर करण्याच्या आपल्या अभियानाबद्दल सांगितले.

 

***

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853221) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi