माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची केंद्रीय संचार ब्युरोने आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला भेट
छायाचित्र प्रदर्शन हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील घटनांचा दस्तावेज, युवापिढीसाठी प्रेरणादायी - श्रीपाद नाईक
Posted On:
16 AUG 2022 6:22PM by PIB Mumbai
पणजी, 16 ऑगस्ट 2022
केंद्रीय पर्यटन आणि नौवहन, बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय संचार ब्युरोने आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनास आज भेट दिली. केंद्रीय मंत्र्यांनी छायाचित्र प्रदर्शनाचे कौतुक केले.

ते म्हणाले, की भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंबंधीत घटनांचे उत्तम चित्रीकरण असलेला हा दस्तावेज आहे. युवा पिढीला हे छायाचित्र प्रदर्शन नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल. आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली, भविष्याकडे वाटचाल करताना राष्ट्र सदैव देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करेल.

बसस्थानकावर आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. युवा वर्गाचा प्रदर्शनाकडे ओढा असलेला दिसून आला. छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी बुधवार, 17 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 यावेळेत खुले आहे.

13 ऑगस्ट रोजी कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेंकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते.
उद्घाटनासंबंधीची बातमी: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1851552
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1852322)
Visitor Counter : 153