माहिती आणि प्रसारण मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो, गोवा आणि कदंब परिवहन महामंडळ यांच्याकडून संयुक्तरित्या मल्टीमिडीया प्रदर्शनाचे आयोजन
स्वातंत्र्यलढ्यावरील छायाचित्र प्रदर्शनामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल- उल्हास तुयेंकर, अध्यक्ष, कदंब परिवहन मंडळ
प्रदर्शन पणजी बसस्थानकावर 17 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 दरम्यान सर्वांसाठी खुले
प्रविष्टि तिथि:
13 AUG 2022 5:13PM by PIB Mumbai
पणजी, 13 ऑगस्ट 2022
स्वातंत्र्यलढा, फाळणीचे विदारक सत्य आणि भारतीय स्वातंत्र्याची पहाट यावर आधारीत छायाचित्र प्रदर्शनाचे केटीसी अध्यक्ष आमदार उल्हास तुयेंकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो, गोवा आणि कदंब परिवहन महामंडळ यांनी संयुक्तरित्या मल्टीमिडीया प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. छायाचित्र प्रदर्शनात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाशी संबंधित 50 पेक्षा अधिक छायाचित्र आणि 'फाळणीचे विदारक सत्य' या विषयावरील छायाचित्र केंद्रीय संचार ब्युरोकडून प्रदर्शित करण्यात आले आहे. यात ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आरंभ’ ते ‘स्वातंत्र्याची पहाट’ या दरम्यानची आंदोलनं, चळवळी यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर देशाच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे वर्णन करणारे 40 पेक्षा अधिक छायाचित्र कदंब महामंडळाकडून प्रदर्शित करण्यात आले आहेत.

याच कार्यक्रमादरम्यान उल्हास तुयेंकर यांच्या हस्ते अमृत महोत्वावर आधारीत दृकश्राव्य प्रचार रथाला झेंडा दाखवण्यात आला. हा प्रचार रथ राज्यभर 19 ऑगस्टपर्यंत फिरणार आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उल्हास तुयेंकर म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रदर्शनांमधून स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचे स्मरण नागरिकांना होते आणि या बलिदानाच्या स्मरणातून युवा पिढीला देशासाठी सर्वोत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन आपला इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

छायाचित्र प्रदर्शनाशिवाय दृकश्राव्य माध्यमातून देशाच्या इतिहासाची माहिती देण्यात आहे. प्रदर्शन पणजी बस स्थानकावर सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत 17 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.





***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1851552)
आगंतुक पटल : 170
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English