माहिती आणि प्रसारण मंत्रालय
देशातल्या सर्व चित्रपटगृहांमध्ये पीएसए फिल्म, हर घर तिरंगा प्रसारित करून फिल्म्स डिव्हिजनचा हर घर तिरंगा मोहीमेत सहभाग
फिल्म्स डिव्हिजनकडून ऑनलाइन चित्रपट महोत्सव "आजादी के रंग"चे आयोजन
Posted On:
12 AUG 2022 9:09PM by PIB Mumbai
मुंबई, 12 ऑगस्ट 2022
भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याचा एक भाग असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेत फिल्म्स डिव्हिजन देशासोबत हर घर तिरंगा मोहीमेमध्ये एका अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून सहभागी झाली आहे..
यानिमित्ताने फिल्म्स डिव्हिजनने 5 ते 18 ऑगस्ट 2022 या पंधरा दिवसांसाठी देशातल्या सर्व चित्रपटगृहांमधून दोन मिनिटांची हिंदी मधून एक पी एस ए फिल्म(PSA film) हर घर तिरंगा प्रदर्शित केली आहे. याच राष्ट्रीय प्रसारणाबरोबर 15 ऑगस्ट 2022 रोजी India@75 सोहळा साजरा करण्यासाठी फिल्म्स डिव्हिजन एक डीव्हीडी सेट प्रदर्शित करणार आहे, या 18 डीव्हीडीमध्ये स्वातंत्र्यसंग्रामा विषयी आणि इतिहासातल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयी माहिती देणारे 18 चित्रपट असतील.

ऑनलाइन फिल्म फेस्टिवल अर्थात चित्रपट महोत्सव साजरे करण्याची आपली परंपरा पुढे नेत फिल्म्स डिव्हिजन आपले संकेतस्थळ आणि युट्युब चॅनेल वरून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान तीन दिवसांचा " आजादी के रंग" हा ऑनलाईन चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. या चित्रपट महोत्सवात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे टप्पे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनपटावर आधारित 11 चित्रपट दाखवले जातील.हा ऑनलाइन चित्रपट महोत्सव, फिल्म डिव्हिजनच्या https://filmsdivision.org/ & YouTube channel - https://www.youtube.com/user/FilmsDivision या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
यापुढे,जनतेच्या जागृतीसाठी फिल्म्स डिव्हिजन आपल्या मुंबईतल्या पेडर रोड इथल्या फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या एलईडी स्क्रीन वरून हर घर तिरंगा मोहिमेसंबंधी सर्व ऑडिओ विज्युअल माहिती प्रसारित करेल. याबाबत फिल्म डिव्हिजनच्या संकेतस्थळावरून आणि सोशल मीडिया हँडल्स वरून अधिकची प्रसिद्धी दिली जाईल. हर घर तिरंगा मोहिमेविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, तसेच फिल्म्स डिव्हिजनच्या भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांवर लक्ष केंद्रित करून एक सेल्फी पॉईंटही निर्माण करण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या या सोहळ्याला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी फिल्म्स डिव्हिजनने आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून सर्वांच्या घरावर हा राष्ट्रध्वज मानाने फडकत राहील. भारताचे स्वातंत्र्य -यंग इंडिया चिरायू होवो
(स्रोत फिल्म डिव्हिजन)
S.Patil/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1851397)
Visitor Counter : 153