दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
‘आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष टपाल तिकीट
Posted On:
12 AUG 2022 7:16PM by PIB Mumbai
पणजी, 12 ऑगस्ट 2022
"आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष कॅन्सेलशन आणि छायाचित्रयुक्त पोस्ट कार्ड्सचे आज मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल श्रीमती विना श्रीनिवास यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले. गोवा टपाल विभागात झालेल्या कार्यक्रमात गोवा विभागाचे पोस्ट मास्तर जनरल आर के जायभाये, टपाल अधीक्षक नरसिंह स्वामी, ज्यांच्यावर आधारीत छायाचित्रयुक्त टपाल कार्ड आहे त्या श्रीमती श्वेता गोवेकर यांची उपस्थिती होती.


मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टकार्डच्या पॅकमध्ये युवकांवर आधारीत 06 पोस्टकार्ड्स आहेत ज्यात 2012 मध्ये महिला ग्रँडमास्टर [WGM] आणि 2019 मध्ये इंटरनॅशनल मास्टर [IM] असा FIDE चा खिताब मिळवणारी भारतीय बुद्धीबळपटू भक्ती कुलकर्णी आणि कृषी उद्योजिका श्वेता गोवेकर यांच्यावर आधारीत पोस्टकार्डसचा समावेश आहे. श्वेता गोवेकर यांच्या उंच माडांच्या झाडांवर अतिशय सहजतेने चढण्याचे कौशल्य युवकांना प्रेरित करणारे आहे.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1851343)
Visitor Counter : 157