पर्यटन मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत उद्या मडगाव येथे ‘हर घर (घरोघरी) तिरंगा’ अभियान
Posted On:
10 AUG 2022 4:38PM by PIB Mumbai
पणजी, 10 ऑगस्ट 2022
केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक उद्या भारत पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या ‘हर घर घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मडगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात श्रीपाद नाईक लोहिया मैदानावर हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतील.
हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्यानंतर श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मडगाव रेल्वे स्थानकावर राष्ट्रीय ध्वज फडकावण्यात येईल. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा आणि हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना श्रीपाद नाईक यांच्या हस्ते तिरंग्याचे वाटप करण्यात येईल.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयांतर्गत असलेल्या भारत पर्यटन विभागाने गोवा शिपयार्ड लिमिटेड, मुरगांव बंदर प्राधीकरण, कोकण रेल्वे आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1850520)
Visitor Counter : 140