संरक्षण मंत्रालय
रन फॉर फ्रीडम – आयएनएस शिवाजी
प्रविष्टि तिथि:
09 AUG 2022 6:27PM by PIB Mumbai
पुणे, 9 ऑगस्ट 2022
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाच्या “आयएनएस शिवाजी’ या लोणावळा येथील प्रशिक्षण केंद्रात भारतीय स्टेट बँकेच्या सहकार्याने 6 ऑगस्ट 2022 रोजी “रन फॉर फ्रीडम” या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.


एकूण 7 विभागांमध्ये झालेल्या या कार्यक्रमात महिला आणि 5 ते 18 या वयोगटातील मुलांसह 500 हून अधिक धावपटूंनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. भारतीय लष्कर विभागातील नागरिक, लोणावळा महानगरपालिका, खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचारी वर्गाने देखील या मिनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला.


देशभक्तीचा जोश आणि लोणावळ्यातील उत्साहवर्धक हवामानामुळे या मिनी मॅरेथॉनमधील धावपटूंमध्ये मोठा उत्साह आणि आनंद दिसून आला, याच जोशात त्यांनी शर्यत पूर्ण केली. या कार्यक्रमाने परस्परांतील सौहार्द आणि एकजुटीची भावना वाढविण्याची संधी प्राप्त करून दिली.


N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1850286)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English