उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती नायडू यांनी उपराष्ट्रपती सचिवालय आणि राज्यसभा सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी दल, डॉक्टरांचे पथक आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी चहापान केले आयोजित
नायडू यांना कर्मचार्यांनी दिला भावनिक निरोप, अनेक वर्ष दिलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल उपराष्ट्रपतींनी मानले आभार
Posted On:
07 AUG 2022 9:17PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत असल्याने त्यांनी गेल्या आठवड्यात उपराष्ट्रपतींच्या सेवेत असणारे उपराष्ट्रपती सचिवालय, राज्यसभा सचिवालयातले अधिकारी आणि कर्मचारी, हवाई दल कर्मचारी तसेच डॉक्टरांचे पथक यांच्यासाठी चहापानाच्या मालिकेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सर्व कर्मचारी सदस्यांनी नायडू यांना भावनिक निरोप दिला तसेच उपराष्ट्रपतींबरोबर काम करतानाच्या त्यांच्या सुखद आठवणींना उजाळा दिला.
आज तत्पूर्वी, नायडू यांनी संसद भवन ॲनेक्स येथे राज्यसभा सचिवालयातील अधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. उपराष्ट्रपतींबरोबर संवाद साधताना अधिकाऱ्यांनी राज्यसभेचे सभापती म्हणून नायडू यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांची आठवण करून दिली तसेच त्यांच्या ओरोग्यपूर्ण आणि आनंदी आयुष्याची कामना करत भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
5 ऑगस्ट रोजी नायडू यांनी उपराष्ट्रपती निवासातील सर्व अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, स्वयंपाकी, वाहन चालक, माळी आणि देखभाल कर्मचार्यांसह सर्व कर्मचाऱ्यांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. उपराष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या पाच वर्षांच्या सहवासाची आठवण सांगताना कर्मचारी भावूक झाले होते. कर्मचाऱ्यांनी उपराष्ट्रपती नायडू, त्यांच्या पत्नी उषा नायडू आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांबरोबरचे अनेक रंजक किस्से आणि सुखद आठवणींचे कथन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी उपराष्ट्रपतींसोबत छायाचित्रेही काढली. नायडू यांनी गेल्या पाच वर्षांतील त्यांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. ज्यांना सचिवालयाचे कर्मचारी आईसमान मानतात अशा उपराष्ट्रपतींच्या पत्नी उषा नायडू, यांनी दाखवलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
2 ऑगस्ट रोजी, उपराष्ट्रपतींच्या दौ-यावर त्यांच्याबरोबर नियमित उड्डाण करणारे भारतीय हवाई दल कर्मचाऱ्यांसाठी तर, 3 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती निवासस्थानात सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांच्या चमूचे त्यांच्या जोडीदारांसह उपराष्ट्रपती निवास येथे चहापान आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना नायडू यांनी त्यांची शिस्त, कठोर परिश्रम आणि कर्तव्याप्रती समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले.
मातृभाषा आणि भारतीय संस्कृतीच्या प्रचाराचे प्रखर पुरस्कर्ते असलेल्या नायडू यांच्या कार्यकाळात वरिष्ठ सभागृहाच्या कामकाजात भारतीय भाषांच्या वापरात लक्षणीय वाढ झाली. 1952 पासून राज्यसभेत प्रथमच डोगरी, कोकणी, काश्मिरी आणि संथाली भाषांचा वापर राज्यसभा सचिवालयाद्वारे एकाचवेळी अनुवाद सुविधांसह करण्यात आला. त्याचप्रमाणे आसामी, बोडो, गुजराती, मैथिली, मणिपुरी आणि नेपाळी भाषांचा वापर राज्यसभेत प्रदीर्घ कालावधीनंतर झाला.
जेव्हा कोविड-19च्या अभूतपूर्व साथीच्या रोगाने जगभरातील जनजीवन विस्कळीत झाले होते तेव्हा संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी नायडू यांच्या नेतृत्वाखाली संसदीय समित्यांच्या अहवालांचे आभासी सादरीकरण यासारखे अनेक कल्पक उपक्रम राबवण्यात आले घेण्यात आले.
भारतीय मूल्यांवर दृढ विश्वास असलेल्या या नेत्याने 'आय बेग टू ले ऑन द टेबल ऑफ द हाऊस' ही संज्ञा वापरणे यांसारख्या अनेक वसाहतवादी प्रथा बंद केल्या आणि त्याऐवजी 'आय रायझ टू ले...' असा शब्दप्रयोग सुरू केला. भारताच्या लोकशाही आचारसंहितेवर भर देण्यासाठी कालबाह्य झालेल्या 'महामहिम' या शब्दाच्या जागी फक्त 'माननीय उपराष्ट्रपती' असा शब्द वापरण्याची सूचना केली.
***
R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1849533)
Visitor Counter : 185