संरक्षण मंत्रालय

देशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाविषयी विविध देशांना स्वारस्य

Posted On: 05 AUG 2022 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

 

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड(HAL),या कंपनीने  लाईट कॉम्बॅट  विमान (LCA) म्हणजेच वजनाने हलक्या असलेल्या लढाऊ विमानाच्या श्रेणीतील  विमानांसाठी रॉयल मलेशियन एअर फोर्स (RMAF), मलेशिया यांच्या कडून फेब्रुवारी 2019 मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या विनंतीला (RFI) प्रतिसाद दिला.  त्यानंतर, रॉयल मलेशियन एअर फोर्स, मलेशिया यांनी 18 फायटर लीड इन ट्रेनर - लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (FLIT - LCA) विमाने आणि HAL ने LCA तेजस ट्विन सीटर प्रकारातील विमानांसाठी जारी  केलेल्या निविदांच्या प्रस्तावाच्या विनंतीला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ऑक्टोबर 2021 मध्ये प्रतिसाद (RFP) दिला. या एलसीए (LCA) प्रकारच्या विमानांमध्ये स्वारस्य असलेले इतर देश: अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, यूएसए, इंडोनेशिया आणि फिलीपिन्स हे होते.

सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक धोरणात्मक पाऊले उचलली आहेत आणि देशात स्वदेशी बनावटीच्या , संरक्षण उपकरणांच्या विकास आणि निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे उत्पादन वाढले आहे.

संरक्षण राज्यमंत्री श्री अजय भट्ट यांनी आज लोकसभेत श्रीमती क्लीन ओझा आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1848926) Visitor Counter : 163


Read this release in: English , Urdu