युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये महिला गटात कोनेरु हम्पी, आर वैशाली यांच्या कामगिरीच्या जोरावर बलाढ्य जॉर्जिया भारताकडून पराभूत


सात्यत्यपूर्ण प्रभावी कामगिरीच्या जोरावर गुकेशची सलग सहाव्या विजयाची नोंद

Posted On: 04 AUG 2022 10:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022

 

तामिळनाडूमधील  ममल्लापुरम येथे सुरु असलेल्या  44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये बुधवारी महिला गटातील सहाव्या फेरीच्या लढतीत भारताच्या कोनेरू हम्पीने महिलांमधील अव्वल बुद्धिबळपटूंपैकी  एक असलेल्या नाना डझाग्निझे विरुद्ध  शानदार विजय मिळवल्यामुळे  भारत अ संघाने तिसऱ्या मानांकित जॉर्जियाचा 3-1 असा पराभव केला.

{44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या  6व्या फेरीत विजय मिळविल्यानंतर कर्णधार ग्रॅण्डमास्टर  अभिजित कुंटेसह भारतीय महिला संघ अ ची  ग्रँडमास्टर कोनेरू हंपी }

हंपी व्यतिरिक्तआर वैशालीने लेला जावखिसविली या अव्वल मानांकित  बुद्धिबळपटूलाही  धक्का दिला. तर तानिया सचदेव आणि हरिका द्रोणवल्ली यांनी सामन्यात बरोबरी साधत भारताला सामना जिंकून देण्यात मदत केली. .

{44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या सहाव्या फेरीत भारताच्या महिला अ संघाची सदस्या आंतरराष्ट्रीय मास्टर वैशाली आर.(छायाचित्र सौजन्य : फीडे (FIDE) }

{44व्या  बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 6 व्या फेरीत खेळताना बुद्धिबळपटू (छायाचित्र सौजन्य : फीडे (FIDE) }

''मी स्पर्धेच्या या टप्प्यावर पदकांचा विचार करत नाही कारण आम्हाला अजूनही युक्रेनसारख्या अनेक बळकट संघांसोबत  खेळायचे आहे.आमच्याकडे  संघभावना मोठ्या प्रमाणात आहे आणि जेव्हा जेव्हा विजयाची गरज असते तेव्हा संघातील कोणताही एक खेळाडू चमकदार कामगिरी करतो.'' , असे हंपी म्हणाली.

''मी अडीच वर्षांनंतर खेळत आहे आणि सुरुवातीचा  काही काळ मला खूप संघर्ष करावा लागला.आजही माझा खेळ नेहमीप्रमाणे लांबला'', असे तिने सांगितले.

भारत आणि जॉर्जिया यांच्या सामन्यासोबत एकाचवेळी झालेल्या  दुसऱ्या सामन्यात रुमानिया आणि युक्रेनने 2-2 अशी बरोबरी साधली.अझरबैजानने कझाकिस्तानचा 3-1असा पराभव केला तर पोलंडने सर्बियाचा 4-0. असा पराभव केला.

{तामिळनाडूतील ममल्लापुरम येथे बुधवारी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 6व्या फेरीत भारताच्या खुल्या ब संघाचे सदस्य ग्रँडमास्टर गुकेश डी. (छायाचित्र सौजन्य : फीडे (FIDE) }

दरम्यान, डी गुकेशने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत  सलग सहावा विजय मिळवला पण  खुल्या विभागात भारत ब संघ  अर्मेनियाकडून 1.5-2.5 ने पराभूत झाल्यामुळे त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले.

निहाल सरीनने दुसऱ्या फेरीत  बरोबरी साधली तर अधिबान बी आणि रौनक साधवानी यांचा  पराभव झाला.

दुसरीकडे भारत क संघाने लिथुआनियावर 3.5-1.5 असा विजय मिळवला  तर द्वितीय मानांकित भारत अ संघाने उझबेकिस्तानला 2-2 असे बरोबरीत रोखले.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1848561) Visitor Counter : 200


Read this release in: Hindi , English , Urdu