गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे तिरंगा ध्वजाचे रचनाकार पिंगळी व्यंकय्याजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'तिरंगा उत्सव' कार्यक्रमाला संबोधित केले


अमित शाह यांनी पिंगळी व्यंकय्याजी यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक टपाल तिकीट जारी केले, तसेच गृहमंत्र्यांनी हर घर तिरंगा हे विशेष गीतही प्रकाशित केले

Posted On: 02 AUG 2022 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे तिरंगा ध्वजाची रचना करणारे पिंगळी व्यंकय्याजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'तिरंगा उत्सव' कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी अमित शाह यांनी पिंगळी व्यंकय्याजी यांच्या कुटुंबीयांना सन्मानित केले आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  एक टपाल तिकीट जारी केले. तसेच  हर घर तिरंगा हे विशेष गीतही  गृहमंत्र्यांनी प्रकाशित  केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001CB9O.jpg

सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री  जी. किशन रेड्डी, दूरसंचार , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री  अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री  अर्जुन राम मेघवाल, परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री  मीनाक्षी लेखी आणि दूरसंचार  राज्यमंत्री  देवुसिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002HXFO.jpg

याप्रसंगी  आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, ज्यांनी तिरंगा ध्वजाला आपल्या आन, बान, शान आणि देशाचे प्रतीक बनवले आणि लोकांमध्ये प्रस्थापित केले,  ते  महान स्वातंत्र्यसैनिक पिंगळी व्यंकय्याजी यांची आज 146 वी जयंती आहे. याच  तिरंगा ध्वजाची शपथ घेऊन देशाचा जवान सीमेवर आपले सर्वस्व अर्पण करतो, हा तिरंगा पाहून देशातील कोट्यवधी शेतकरी संपूर्ण जगाचे पोट भरण्यासाठी मेहनत  करतात आणि हाच  तिरंगा देशवासियांच्या हृदयात देशाचे चिन्ह  म्हणून स्थापित झाले आहे असे शाह म्हणाले.

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003DDLB.jpg

अमित शाह म्हणाले की, हे वर्ष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा  कार्यक्रम सुरू केला आहे. ते म्हणाले की, कल्पना करा की ज्या दिवशी देशातील 20 कोटी घरांवर तिरंगा ध्वज अभिमानाने फडकेल , त्या दिवशी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे  महत्त्व आपल्या मनात चैतन्य जागवेल . ते म्हणाले की  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी   2 ऑगस्टपासून प्रत्येकाने आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे आणि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर  तिरंगा फडकावून संपूर्ण जगाला दाखवून द्यायचे आहे  की मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत पुन्हा महान देश बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे .

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004RUH5.jpg

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामागे तीन उद्देश आहेत असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. एक ,  हजारो अज्ञात स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली,   व्यंकय्याजीं सारख्या स्वातंत्र्य चळवळीतील शूर वीरांच्या गाथा स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाच्या माध्यमातून तरुण पिढीसमोर मांडणे हा आहे .1857 ते  1947 पर्यंतच्या  90 वर्षांच्या स्वातंत्र्य लढ्यात देशातील लाखो सुपुत्रांनी देशाला इंग्रजांच्या तावडीतून  मुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले होते , हे वर्ष त्या सर्व  शहीदांना श्रद्धांजलि वाहण्याचे  माध्यम ठरत आहे.

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0054V18.jpg

दुसरा  उद्देश   स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात भारताने प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे , ती देश-विदेशातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.  तिसरा उद्देश  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंतचा हा 25  वर्षांचा कालखंड  संकल्पाचा कालखंड आहे.

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006AVQ5.jpg

हे वर्ष प्रत्येक नागरिकासाठी , 2047 मध्ये प्रत्येक क्षेत्रात भारत कसा आणि कुठे असेल याचा संकल्प  करण्याचे आणि प्रत्येक क्षेत्रात भारताला सर्वोत्कृष्ट बनवण्याचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत वर्षात   करण्यात आलेले हे संकल्प जर आपण सर्वांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ म्हणजेच 2022 ते 2047 या  25 वर्षात पूर्ण केले  तर भारत माता नक्कीच विश्वगुरू बनेल.

भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या संविधानाच्या शिल्पकारांचा  दृष्टीकोन  आणि अपेक्षांनुसार भारताची समृद्धी, सुरक्षा आणि संस्कृती वाढवण्यासाठी एकजुटीने काम केले पाहिजे,हा संदेश पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या  घरोघरी तिरंगा मोहिमेतून  संपूर्ण जगाला मिळणार आहे. त्यांनी देशातील तरुणांना सांगितले की, घरोघरी  तिरंगा मोहीम ही तुमची मोहीम  आहे, महान भारताच्या निर्मितीचा पुन्हा एकदा शुभारंभ करण्याची ही मोहीम आहे, या मोहिमेत सहभागी  व्हा आणि तुमच्या घरावर तिरंगा ध्वज  फडकवा आणि त्यासोबत सेल्फी घेऊन  www.harghartiranga.com या संकेतस्थळावर  अपलोड करत भारताला बळकट  करण्यासाठी आपले योगदान द्या.  .

तिरंगा ध्वज निर्मितीची प्रक्रिया आपण कधीही विसरू नये. तिरंगा ध्वजाच्या निर्मितीचा प्रवास आणि त्यानंतर संविधान सभेने स्वीकारलेल्या  तिरंगा ध्वजाचा प्रवास समजून घेतला, तर पिंगळी व्यंकय्याजींची आठवण आल्याशिवाय  राहता येणार नाही.या महान तेलुगू राष्ट्रसेवक आणि स्वातंत्र्यसैनिकाने कोट्यवधी भारतीयांच्या आशा, आकांक्षा आणि आदर तीन रंगात सामावून संपूर्ण भारताला एकतेच्या धाग्यात जोडण्याचे काम केले, संपूर्ण कृतज्ञ देशाच्या वतीने मी पिंगळी व्यंकय्या जी यांना विनम्र अभिवादन करतो, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.  तिरंगा ध्वजाची रचना करणारे पिंगळी व्यंकय्या जी यांनी गांधीजी आणि लोकमान्य टिळकांच्या तत्त्वांचे पालन करून कोणताही स्वार्थ न ठेवता एका मूक राष्ट्रसेवकाप्रमाणे आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रहितासाठी समर्पित केले.जेव्हा देशाने तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून  स्वीकारला, तेव्हा हा तिरंगा आपल्या देशाची शान आणि अभिमान बनला.

7 ऑगस्ट 1906 रोजी राष्ट्रध्वजाचा प्रवास सुरू झाला. 1921 मध्ये महात्मा गांधींनी नवीन राष्ट्रध्वजाची रचना  करण्याचे काम पिंगली व्यंकय्या जी यांना दिले. 29 डिसेंबर 1943 रोजी महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष बाबू यांनी पोर्ट ब्लेअर येथे तिरंगा फडकावला होता.तिरंग्यातील  भगवा रंग त्याग, बलिदान आणि शौर्याचे प्रतीक आहे, हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे, पांढरा रंग शांतता आणि एकात्मतेचे प्रतीक आहे.मध्यभागी असलेल्या अशोकचक्राचे   24 आरे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत. आज संपूर्ण जग भारताकडे आणि भारताच्या राष्ट्रध्वजाकडे आदराने पाहत आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

2014 पासून ते आज 2022 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी जगभरात भारताचा सन्मान वाढवण्याचे काम केले आहे.जगात कोणतीही समस्या असो , पण जोपर्यंत भारताचे पंतप्रधान मोदीजी यांचे विचार समोर येत नाहीत, तोपर्यंत जगाला  कोणत्याही समस्येवर आपले मत ठरवता येत नाही. हा दिवस पाहण्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे .अशा भारताची निर्मिती, जो आत्मनिर्भर आहे, आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगतो, आपल्या भविष्यासाठी केवळ आश्वस्त न राहता  भारतातील तरुणांच्या मनात भविष्याची रूपरेषा स्पष्ट असणाऱ्या  अशा  नव्या भारताची निर्मिती  मोदीजींच्या समोर, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कल्पनेनुसार  होत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री  म्हणाले.  प्रत्येक किशोर, तरुणाच्या मनात देशभक्तीचा संस्कार जागृत झाला की मग ती देशाची मोठी ताकद बनते आणि देशाला या क्षेत्रात महान बनवण्याची ऊर्जा प्रदान करते, असे अमित शहा यांनी सांगितले.

 

* * *

Jaydevi PS/Sonal/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847924) Visitor Counter : 184


Read this release in: Urdu , English , Hindi , Telugu